Devendra Fadnavis, Nitin Gadkari and all-rounder Hardik Pandya of the Indian cricket team participated in the event in Nagpur | Video: देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींनी हार्दिक पांड्याला केली गोलंदाजी अन्...

Video: देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींनी हार्दिक पांड्याला केली गोलंदाजी अन्...

नागपूर: राजकारणात आपल्या भाषणातून विरोधकांना धारेवर धरण्याची कला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिसून येते. मात्र क्रिकेटमध्ये देखील देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी गुगली टाकण्यात चांगलेच तरबेज असल्याचे नागपूरमधील खासदार क्रीडा महोत्सवात दिसून आले. 

नागपूरमधील खासदार क्रीडा महोत्वाच्या शुक्रवारी समारोप झाला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या देखील सामील झाला होता. कार्यक्रमाच्या दरम्यान हार्दिक पांड्या देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दिग्गजांचा क्रिकेट सामना रंगला.

हार्दिक पांड्या फलंदाजी करत असताना देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी गोलंदाजी करण्यास पसंती दिली.यावेळी पांड्याने जोरदार फटकेबाजी केली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एक टाकलेला चेंडू हार्दिक पांड्यालाही खेळता आल्याने नागपूरकरांनी चांगलाच आनंद घेतला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Devendra Fadnavis, Nitin Gadkari and all-rounder Hardik Pandya of the Indian cricket team participated in the event in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.