देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 03:02 PM2023-11-30T15:02:22+5:302023-11-30T15:21:07+5:30

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर आरोप करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक असल्याचे विधान केले आहे.

Devendra Fadnavis is the father of Maratha reservation, statement of Chandrashekhar Bawankule | देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर आरोप करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक असल्याचे विधान केले आहे.

२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले नसते, तर भाजप सत्तेत आली नसती आणि मराठा आरक्षण देण्याचा प्रश्‍न तेव्हाच सुटला असता असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कधीही विचार केला नाही. तो विचार सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कायदा केला. पण, या नतद्रष्टांनी मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे, हे मांडण्याची पद्धत चुकवली. जेव्हा हे प्रकरण अंतिम टप्प्यात होते, तेव्हा हे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री झोपी गेले होते का? असा सवाल करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. 

याचबरोबर, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. तसेच, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यभरात मराठा आरक्षणासाठी रान पेटले आहे. मराठा आंदोल मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्याआधीच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, यासाठी आता मराठा समाजाकडून सरकारवर दबाव वाढत आहे.

Read in English

Web Title: Devendra Fadnavis is the father of Maratha reservation, statement of Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.