शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस, अजित पवार वर्षावर आले, शिंदेंना सोबत घेऊन राजभवनावर गेले; सत्ता स्थापनेचा दावा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:20 IST

Devendra Fadnavis CM Post oath: थोड्याच वेळात हे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. राज्यपाल भवनात तिन्ही नेते एकत्र बसलेले आहेत. तसेच प्रफुल्ल पटेल हे पवारांच्या बाजुला बसलेले आहेत. 

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने आज राज्यपालांच्या भेटीला देवेंद्र फडणवीसांसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नुकतेच तिन्ही पक्षांचे नेते राजभवनावर पोहोचले आहेत. शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी फडणवीस आणि अजित पवार गेले होते. यानंतर तिन्ही नेते राजभवनावर पोहोचले व सत्तास्थापनेचा दावा केला.

शिंदे आणि फडणवीस हे एकाच कारमधून राजभवनावर पोहोचले आहेत. या कारमध्ये गिरीष महाजनही होते. तर अजित पवार हे त्यांच्या कारमधून आले, अजित पवारांसोबत धनंजय मुंडे कारमध्ये होते. भाजपाचे अन्य काही आमदारही राजभवनावर पोहोचले. यानंतर थोड्याच वेळात या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.  

५ वर्षांनी ते पुन्हा आले!देवेंद्र फडणवीस हे राज्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. २०१४ साली फडणवीसांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा भव्यदिव्य सोहळा पार पडला होता. २०१४ ते २०१९ सलग ५ वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले होते. २०१९ च्या निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्या राजकीय घडामोडीत अजित पवारांनासोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. परंतु अवघ्या ७२ तासांत त्यांना मुख्यमंत्रि‍पदावरून पायउतार व्हावे लागले. २०१९ मध्ये फडणवीसांनी निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन, याच भूमिकेत, याच निर्धाराने अशी घोषणा केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या खेळीमुळे फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदी बसावं लागले. त्यानंतरच्या काळात विरोधकांनी मी पुन्हा येईन घोषणेवरून फडणवीसांची खिल्ली उडवली परंतु आज ५ वर्षांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आहेत.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवार