शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हिताचे धोरण राबवा

By admin | Updated: October 30, 2015 01:05 IST

राज्यात दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्या हिताचे धोरण आखण्याची सूचना राज्य सरकारला केली

मुंबई : राज्यात दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्या हिताचे धोरण आखण्याची सूचना राज्य सरकारला केली. त्याचप्रमाणे, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुुटुंबीयांची परिस्थिती काय आहे, अशी विचारणा करीत, त्याबाबतची संपूर्ण माहिती देण्याची सूचना न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने केली.यावर्षी मराठवाड्यात ६०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने, उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत, ‘सू-मोटो’ दाखल करून घेतले. ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची ‘न्यायालयीन मित्र’ म्हणून नियुक्ती केली. गुरुवारच्या सुनावणीच्या वेळी अ‍ॅड. कुंभकोणी यांनी गेल्या पाच वर्षांत राज्यात १५,९७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सादर केली आहे. ‘आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन-चार एकर जमीन आहे. मात्र, या अल्पभूधारकांना काहीच उत्पन्न मिळत नसल्याने ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे समाजाला तोंड कसे दाखवायचे, या भीतीने ते आत्महत्या करत आहेत. ज्यांच्या मालकीची शेती नाही आणि जे शेतमजूर आहेत, अशी लोक आत्महत्या करत नाहीत. केवळ समाजाच्या भीतीने काही शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशा अनेक बाबी संशोधनातून पुढे आल्या आहेत,’ असे त्यांनी माहितीत नमूद केले आहे. त्यावर खंडपीठाने एकत्रित शेती पद्धत राबवण्याची सूचना राज्य सरकारला केली. एकत्रित शेती पद्धत करण्यासाठी एपीएमसी कायद्यात सुधारणा करावी लागली तर करा, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)