शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन चिकित्सा पद्धती विकसित करून जपणार

By admin | Updated: September 29, 2015 02:01 IST

रिफ्लेक्सोलॉजी, चुंबक चिकित्सा, अ‍ॅक्युप्रेशर, योगा, प्राणायाम यासह भारतातील प्राचीन चिकित्सा पद्धती जपणे गरजेचे आहे.

औरंगाबाद : रिफ्लेक्सोलॉजी, चुंबक चिकित्सा, अ‍ॅक्युप्रेशर, योगा, प्राणायाम यासह भारतातील प्राचीन चिकित्सा पद्धती जपणे गरजेचे आहे. त्या विकसित करून नव्या रूपात लोकांसमोर आणायच्या आहेत. अधिकाधिक रुग्णांना त्यांचा फायदा होईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असा सूर जागतिक रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहानिमित्त रविवारी आयोजित पहिली राष्ट्रीय परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्यात तज्ज्ञांनी व्यक्त केला.२१ ते २७ सप्टेंबरदरम्यान जागतिक रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अ‍ॅक्युप्रेशर ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे रविवारी प्रेसिडेंट लॉन येथे राष्ट्रीय परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर डॉ. पी.बी. लोहिया, डॉ. दिलीप कांबळे, संयोजक डॉ. अनिल जैन यांची उपस्थिती होती. सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशर क्षेत्रात तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत देशभरातील ४० डॉक्टरांना गोल्ड, सिल्वर आणि डायमंड पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सोहळ्यात मार्गदर्शन करताना राजेंद्र दर्डा म्हणाले, शहरात डॉ. अनिल जैन यांनी २००३मध्ये अ‍ॅक्युप्रेसनर ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरची स्थापना केली. या माध्यमातून रिफ्लेक्सोलॉजीला वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे. देशात रिफ्लेक्सोलॉजीद्वारे देशात मोठे कार्य होत असून, त्यास आणखी पुढे नेण्याची आवश्यकता आहे.हरिभाऊ बागडे म्हणाले, अ‍ॅक्युप्रेशर उपचारपद्धतीचा आज देशभरात प्रसार झाला आहे. या तंत्रज्ञानाचा समाजाला उपयोग होत आहे. खा. खैरे म्हणाले, आगामी कालावधीत रिफ्लेक्सोलॉजीचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार होईल.डॉ. अनिल जैन म्हणाले, गेल्या १० वर्षांपासून रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह आयोजित केला जात आहे; परंतु भारतात या प्रकारचा जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आलेला नाही. देशात प्रथमच या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्यात अ‍ॅक्युप्रेशरशी संबंधित डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सप्ताहानिमित्त शहरात २१ ठिकाणी नि:शुल्क चिकित्सा व जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर परिषदेत देशभरातून आलेल्या डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. आयोजित कार्यक्रमासाठी नीलेश कांकरिया, संदीप काठेड, शालीन बुनलिया, डॉ. विजय जैन, शैलेश चांदीवाल, विनया चामले, बाळासाहेब जोशी, सय्यद अजमत, शेख खालीद, हर्षाली संचेती, नुपूर बलदवा, मनीष बुनलिया, राजेंद्र पगारिया, झैनाब जमाल, पुष्पा जाधव, डॉ. एस.बी. गोरवाडकर, डॉ. योगेश जैन आदींनीपरिश्रम घेतले.