शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

“महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा”; DCM शिंदेंचे कार्यकर्त्यांना आदेश, ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 21:10 IST

Deputy CM Eknath Shinde News: सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळाले हे पाहिले पाहिजे. कार्यकर्ते जोडा, कार्यकर्ता जपा. निवडणुकीच्या कामाला लागा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Deputy CM Eknath Shinde News: सगळ्यांनी मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळेल. नांदेडमध्ये शिवसेनेचे तीन आणि महायुतीचे सगळे मिळून नऊ आमदार निवडून आणले आहेत. आता मुंबईत ठरलेले मतदारसंघ वगळता कोणीही मतदारसंघ सोडणार नाही. आमदारकीच्या निवडणुका झाल्या आहेत, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे आता आपले फाउंडेशन आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. 

एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांचे फक्त मंत्रालयात बसायचे काम नाही, फेसबुक लाइव्ह नाही, तर फेस टू फेस काम करायचे असते. गरम पाणी प्या, तोंडाला मास्क लावा, एवढ्या पुरते काम नाही. लोकांना भेटावे लागते, शेतकऱ्यांच्या बांधावर जावे लागते, बहिणींना भेटावे लागते, भावाला भेटावे लागते. मी जिथे जातो तिथेच मंत्रालय सुरू होते, ऑन द स्पॉट काम करतो. अडीच वर्षात एवढ्या सह्या केल्या सर्व रेकॉर्ड मोडले, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४६० कोटी रुपये दिले, किती लोकांचे जीव वाचले, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

कार्यकर्ते जोडा, कार्यकर्ता जपा

सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळाले हे पाहिले पाहिजे. विश्वास, प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही, ही आपल्या शिवसैनिकांची पुंजी आहे. कार्यकर्ते जोडा, कार्यकर्ता जपा, पदाधिकारी नेमताना जवळचा परका असा भेदभाव करू नका, जे आपण पेरले ते उगवले, विधानसभेत इतक्या जागा येणे म्हणजे सुवर्ण अक्षराने नोंद करावा असा इतिहास आहे. सगळ्या महाराष्ट्रातून शिवसेनेत प्रवेश होत आहेत. प्रवेशांना वेग आला आहे, आपल्या पक्षात कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही  हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

दरम्यान, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आणि खरी शिवसेना कोण हे मतदारांनी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. शिवसेना वाढत असून राज्यभरातून ठाकरे गट आणि इतर पक्षांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाचे परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचेही मनापासून स्वागत केले, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेElectionनिवडणूक 2024Shiv Senaशिवसेना