याकूब मेमनचा भोजनास नकार

By Admin | Updated: July 23, 2015 01:18 IST2015-07-23T01:18:54+5:302015-07-23T01:18:54+5:30

फाशी जवळपास निश्चित झाल्याने मुंबईच्या भीषण बॉम्बस्फोटातील सिद्धदोष आरोपी याकूब मेमन हा विचलित झाला आहे

Denial of Yakub Memon | याकूब मेमनचा भोजनास नकार

याकूब मेमनचा भोजनास नकार

नागपूर : फाशी जवळपास निश्चित झाल्याने मुंबईच्या भीषण बॉम्बस्फोटातील सिद्धदोष आरोपी याकूब मेमन हा विचलित झाला आहे. मंगळवारी रात्री त्याने भोजन करण्यास नकार दिला. बुधवारी सकाळीसुद्धा नाश्त्याची प्लेट घेऊन आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याने परत पाठवले. याकूबच्या या वागण्यामुळे तुरुंगातील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.
तुरुंग प्रशासनाकडून त्याची वैद्यकीय तपासणी आणि भोजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याला फाशी यार्डमध्येच ठेवण्यात आले आहे. मंगळवारी रात्री भोजन घेऊन आलेल्या तुरुंग अधिकाऱ्याला
त्याने परत पाठविले. याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ देण्यात आली.
बुधवारी सकाळी तुरुंग प्रशासनाचा एक वरिष्ठ अधिकारी स्वत: याकूबसाठी नाश्त्याची प्लेट घेऊन गेला. गेल्या आठवडाभरापासून तो अधिकारी याकूबच्या अगदी जवळ आहे. त्यांच्या माध्यमातूनच याकूबने भाऊ आणि वकिलाची भेट घेतली होती. ते फाशी टीमचे प्रमुख सुद्धा आहेत. त्यांनी याकूबला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याने काहीही ऐकले नाही, जवळपास अर्धा तास समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Denial of Yakub Memon