शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात दोघांचा डेंग्यूने मृत्यू

By admin | Updated: October 12, 2014 00:46 IST

एकाला डेंग्यू तर दुस-याला डेंग्यूसदृश्य ताप

अकोला : डेंग्यमुळे जिल्ह्यातील कट्यार येथील एक ४0 वर्षीय महिला व ६0 वर्षीय इसमाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. अस्वच्छता, पाण्याच्या डबक्यांमध्ये होणारी डासांची उत्पत्ती, यामुळे जिल्हय़ात डेंग्यूसदृश आजारांचे थैमान माजले असताना, दोघांचा डेंग्यूने बळी घेतल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.जिल्हय़ात साथरोगांसोबतच टायफाईड, डेंग्यूसदृश तापाची साथ असून, व्हायरलने अनेकांना हैराण केले आहे. रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. जिल्हय़ात आतापर्यंंत जवळपास १२ जणांचा डेंग्यू व डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे. कट्यार येथील राजाराम विठ्ठल सोळंके (६0) यांचा शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना गुरुवारी मृत्यू झाला. सोळंके यांचा मृत्यू डेंग्यूसदृश्य आजाराने झाल्याचे येथील डॉक्टरांनी अहवाल दिला आहे. यासोबतच याच गावातील सविता राजेंद्र ढोरे (४0) ही तापाने आजारी होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जिल्हय़ात डेंग्यूसदृश ताप आणि टायफाईडच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या रुग्णांवर नेमका कशाप्रकारे औषधोपचार करावा, याबाबत डॉक्टरही गोंधळात सापडले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छतेकडे कानाडोळा केल्यामुळेही साथीच्या तापाचा उद्रेक होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा आजार डेंग्यूसदृश्य असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. उन्हामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून, ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना लवकर प्रादुर्भाव होत असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहरासह जिल्हय़ातील ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा प्रकोप झाला आहे. गत एक महिन्यापासून रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सवरेपचार रुग्णालयामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू असून, खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची प्रचंड गर्दी आहे.