शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच अमान्य आहे का?

By admin | Updated: May 30, 2014 01:13 IST

अ.भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात येणार्‍या अ.भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येते. पण त्यामुळे महामंडळाला हवा तो अध्यक्ष निवडता येत नाही. साहित्य वाचकांना हवा तो

अ.भा. मराठी साहित्य महामंडळ : ३१ मेच्या बैठकीत निवडणूक रद्द करण्याचा प्रस्तावराजेश पाणूरकर - नागपूरअ.भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात येणार्‍या अ.भा. साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येते. पण त्यामुळे महामंडळाला हवा तो अध्यक्ष निवडता येत  नाही. साहित्य वाचकांना हवा तो अध्यक्ष निवडीचे स्वातंत्र्य देण्यापेक्षा महामंडळ सदस्यांनाच  अध्यक्ष निवडीचे संपूर्ण अधिकार देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यासंदर्भात साहित्य  महामंडळाची बैठक ३१ मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली असून, संमेलनाध्यक्षपदाची  निवडणूकच रद्द करण्याचा प्रयत्न आहे.      याविरोधात तमाम मराठी वाचक, साहित्य रसिक आणि साहित्यिकांनी मत व्यक्त केले असून,  महामंडळाला लोकशाहीच अमान्य आहे का? असा सवाल करण्यात आला आहे.           साहित्य  संमेलनाध्यक्ष निवडीसाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते.मतदानाचा अधिकार द्याकाही निवडक मतदारांनाच मतदानाचा अधिकार आहे. प्रत्येक घटकसंस्थेला केवळ १७५  सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यात विदर्भ साहित्य संघाचे सदस्य सात हजार आहेत. मुंबई,  मराठवाडा साहित्य परिषदेची सदस्य संख्या एक हजार ते बाराशे आहे. पण त्यांनाही १७५ मतांचाच अधिकार आहे. त्यामुळे सर्व घटक साहित्य संस्थाच्या एकूण २0  हजार मतदारांना संमेलनाध्यक्ष निवडीचा अधिकार असावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत  आहे. या मागणीचा परिणाम म्हणूनच गेल्या दोन वर्षांंंपूर्वी मतदारांची संख्या चौथ्यांदा वाढविण्यात  आली. मतदार संख्या वाढविण्यात आली असली तरीही महाराष्ट्रातल्या १३ कोटी साहित्य  रसिकांचे प्रतिनिधित्व ही संख्या करू शकत नाही. पण किमान लोकशाही पद्धतीने निवडणूक होत  असल्याने रसिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. त्यात आता महामंडळ निवडणूक रद्द करून  संमेलनाध्यक्ष थोपविणार असेल तर लोकशाहीच अमान्य करण्यासारखे आहे. महामंडळाचे  निवडक सदस्य १३ कोटी मराठी जनतेचे प्रतिनिधित्व कसे करू शकतात? असा सवाल  महाराष्ट्रातल्या तमाम साहित्यिकांनी केला आहे. काही साहित्यिक संमेलनाध्यक्षपदासाठी  निवडणूक लढविण्याचा विरोध करतात. अशा काही साहित्यिकांना महामंडळ संमेलनाध्यक्ष करू  इच्छिते. यंदा यात ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांना संमेलनाध्यक्ष करण्याची तयारी सुरू असल्याचे  कळते. पण ना.धों. महानोर लोकशाही पद्धतीने विधान परिषदेत जाऊ इच्छितात तर संमेलनाध्यक्ष  पदासाठी ते निवडणूक का नाकारत आहेत? असाही तिखट सवाल आता मराठी जनतेने केला  आहे. साहित्य महामंडळाचे विश्‍व मराठी साहित्य संमेलन घटनादुरुस्तीच्या मुद्यावर अडचणीत  सापडले असताना, घटनाबाह्य निवडणूकच रद्द करण्याचा विचारही करण्याचे धाडस महामंडळ  कसे काय करू शकते? आतापर्यंंंत निवडणूक रद्द करून संमेलनाध्यक्षांची निवड करण्याबाबत  अनेक वेळा विचार करण्यात आला. पण प्रत्येक बैठकीत निवडणुकांशिवाय पर्याय नाही, असाच  निर्णय घेण्यात आलेला आहे. हे चित्र स्पष्ट असताना निवडणूक रद्द करण्याचा प्रयत्न करणे  चुकीचे ठरते. यापेक्षा साहित्यावर प्रेम करणार्‍या सर्व घटक संस्थांच्या सदस्यांना मतदानाचा  अधिकार देण्याची मागणी समोर येते आहे. ३१ मेच्या महामंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो, ते  कळेलच.(प्रतिनिधी)