शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 05:48 IST

या याचिकेत संध्याकाळी ६:०० वाजल्यानंतर सुमारे ७६ लाख मते बेकायदेशीररीत्या घुसवल्याचा आरोप करण्यात आला होता.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६:००नंतर मतदान झाल्यामुळे कोणत्या विजयी उमेदवाराला फायदा झाला, याचे ठोस पुरावे नसल्याने याचिकेत तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने बुधवारी निवडणुकीचा निकाल रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. याचिकाकर्त्याने न्यायालयाचा एक दिवस वाया घालवला, त्याला दंड ठोठावणे आवश्यक होते, अशी टिप्पणीही खंडपीठाने केली. 

या याचिकेत संध्याकाळी ६:०० वाजल्यानंतर सुमारे ७६ लाख मते बेकायदेशीररीत्या घुसवल्याचा आरोप करण्यात आला होता.   

याचिकाकर्त्याने सर्व विजयी उमेदवारांना प्रतिवादी केले नाही. तसेच २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही हाच पॅटर्न होता, तर त्यावेळी आक्षेप का घेतला नाही? असा प्रश्न न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला केला. मुंबईचे रहिवासी चेतन अहिरे यांनी ही याचिका दाखल केली होती. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अहिरे यांच्यावतीने बाजू मांडली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि ६:००नंतरच्या मतमोजणीतील अनियमितता असे मुख्य आक्षेप याचिकेत घेण्यात आले होते. 

याचिकाकर्त्याने सर्व विजयी उमेदवारांना प्रतिवादी केले नाही. त्यामुळे ही याचिका दाखल करून घेऊ शकत नाही, हा निवडणूक आयोगाचा मुद्दा उच्च न्यायालयाने योग्य असल्याचे नमूद करीत याचिका फेटाळली.

न्यायालयाने उपस्थित केलेले मुद्दे 

लोकसभा निवडणुकीतही हाच पॅटर्न होता त्यावेळी आक्षेप का घेतला नाही? 

६:००नंतर मतदान केल्यामुळे कोणत्या विजयी उमेदवाराला फायदा झाला, याचे ठोस पुरावे नाहीत.याचिकाकर्त्याने सर्व विजयी उमेदवारांना प्रतिवादी केले नाही.

याचिकाकर्त्याने न्यायालयाचा एक दिवस वाया घालवल्याने दंड ठोठावणे आवश्यक होते. मात्र, आम्ही तसे करणार नाही. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMumbai High Courtमुंबई हायकोर्टmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४