हर्षवर्धन जाधवांवर कारवाई करण्याची मागणी

By Admin | Updated: December 20, 2014 02:37 IST2014-12-20T02:37:06+5:302014-12-20T02:37:06+5:30

पोलीस निरीक्षकास मारहाण करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर कडक कारवाई करावी,

Demand for action against Harshvardhan Jadhav | हर्षवर्धन जाधवांवर कारवाई करण्याची मागणी

हर्षवर्धन जाधवांवर कारवाई करण्याची मागणी

नागपूर : पोलीस निरीक्षकास मारहाण करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जोरदार निदर्शने केली.
जाधव यांनी पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना बुधवारी सायंकाळी कानशिलात लगावली होती. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तथापि, अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे त्यांना पोलीस अटक करू शकले नाहीत. दरम्यान, घटनेमुळे आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांत तीव्र रोष निर्माण झाला आहे.

Web Title: Demand for action against Harshvardhan Jadhav