शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांना हटवा!

By admin | Updated: June 25, 2014 01:16 IST

राज्यातील दलित, मुस्लिमांवरील वाढत्या अत्याचारप्रकरणी वेगाने तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले

अहमदनगर :  राज्यातील दलित, मुस्लिमांवरील वाढत्या अत्याचारप्रकरणी वेगाने तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले असून त्याला गृहमंत्री आर.आर. पाटील जबाबदार असल्याचा आरोप करत गृहमंत्र्यांना हटविण्याची मागणी खा. हुसेन दलवाई यांनी केली आहे.
आरोपींना शिक्षा होण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासात पोलीस निष्क्रियता दाखवित आहेत. पोलिसांकडूनच आरोपींना संरक्षण मिळत असून स्वत:च्या खात्यावर पाटील यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी तातडीने पाटील यांना हटवून त्यांच्या जागी दुसरा सक्षम गृहमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी दलवाई यांनी येथे केली. 
राज्यात पुन्हा आघाडीचीच सत्ता येणार असून राज्याचे गृहमंत्रीपद काँग्रेस घेणार आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हे कमी होणार नाहीत, असेही ते म्हणाले. खर्डा, सोनई, आष्टी, पुणो आदी ठिकाणी दलित, मुस्लिमांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र पोलीस तपासकामी निष्क्रिय झाले आहेत. राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त अडीच टक्के आहे. त्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेशात शिक्षेचे प्रमाण अनुक्रमे 35 व 5क् टक्के आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
शंकराचार्यानी त्यांचा चेहरा आरशात पाहावा
शिर्डीच्या साईबाबांना सर्व समाज मानतो. त्यांचे जीवन विनयशील, सेवाभावी होते. सेवाभाव वृत्तीमुळेच त्यांनी संतत्व मिळविले. साईबाबांविषयी लोकभावना भडकाविणारे शंकराचार्याचे वक्तव्य निषेधार्ह आहे. शंकराचार्यानी त्यांचा चेहरा आधी आरशात पाहावा. वादग्रस्त वक्तव्याने त्यांचा समाजातील आदर कमी झाला आहे. भाजपाचे सरकार आल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांना आकाश ठेंगणो झाले आहे, असे दलवाई म्हणाले.
 
अत्याचाराच्या घटनेनंतर उज्‍जवल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाते. खैरलांजीचा निकाल काय लागला, यावरून निकम यांची कार्यपद्धतीही संशयास्पद वाटते. त्यामुळे निकम यांची नियुक्ती या प्रकरणात करू नये. सगळ्याच गोष्टींना काही निकम हे एकमेव उत्तर नाही, असे दलवाई म्हणाले.