शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: मुंबईत पावाच्या लादीत ५ रुपयांची वाढ, पेट्रोल-डिझेलही महागले
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
6
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
7
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
8
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
9
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
10
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
11
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
12
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
13
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
14
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
15
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
16
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
17
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
18
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
19
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
20
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
Daily Top 2Weekly Top 5

'पुणे पदवीधर'ला लाखाचा धक्का; 'शिक्षक'चेही मतदार घटले, डिसेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता

By अशोक डोंबाळे | Updated: March 25, 2026 16:22 IST

इच्छुकांची संख्या घटल्याचा परिणाम  

अशोक डोंबाळे

सांगली : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंख्येत झालेली मोठी घट आता थेट राजकीय समीकरणांवर परिणाम करताना दिसत आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत पदवीधर मतदारसंघात तब्बल एक लाख १५ हजार मतदार कमी झाले असून, शिक्षक मतदारसंघातही २० हजारांहून अधिक घट झाली आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत चुरस कमी होऊन ‘मर्यादित लढती’चे चित्र दिसत आहे. डिसेंबर २०२६ मध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.

२०२० च्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात तब्बल ६२ इच्छुक रिंगणात होते, तर शिक्षक मतदारसंघातही डझनभर इच्छुक उमेदवार होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पदवीधरमधून आमदार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातून आमदार जयंत आसगावकर यांनी विजय मिळवला होता. महायुतीच्या उमेदवारांचा दोन्ही जागांवर पराभव झाला होता. मात्र यंदा सर्वच पक्षांमधील इच्छुकांची संख्या कमी झाल्याने मतदार नोंदणीवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 

पुणे पदवीधर मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी महायुतीकडून क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि महाआघाडीकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख इच्छुक असल्याची चर्चा आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत इच्छुकांची संख्या कमी असल्याचा मतदार नोंदणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दि. १३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. त्यानुसार पुणे पदवीधर मतदारसंघात सध्या तीन लाख १०,९६४ मतदार आहेत, जे २०२० मध्ये चार लाख २६ हजार २५७ होते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७५ हजार ४९८ मतदारांनी घट झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र २ हजार १६७ मतदार वाढले आहेत.

शिक्षक मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. २०२० मध्ये ७२ हजार ५४५ असलेली मतदारसंख्या आता ५१ हजार ९७९ वर आली आहे. पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत घट झाली असताना सांगली जिल्ह्यात ५१० मतदारांनी वाढ झाली आहे. सध्या मतदार नोंदणी सुरू असली तरी इच्छुकांची कमी संख्या पाहता मोठी वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आमदारांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने डिसेंबर २०२६ मध्ये निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

२०२० पुणे पदवीधर मतदार

जिल्हा / मतदार २०२० / मतदार २०२६

  • पुणे / १,३६,६११ / ६,१,११३
  • सातारा / ५९,०७१ / ४२,०६३
  • सांगली / ८७,२३३ / ७८,३६६
  • कोल्हापूर / ८९,५२९ / ९१,४००
  • सोलापूर / ५३,८१३ / ३८,०२२
  • एकूण / ४,२६,२५७ / ३,१०,९६४
     

पुणे शिक्षक मतदारसंख्या

जिल्हा / मतदार २०२० / मतदार २०२६

  • पुणे / ३२,२०१ / १२,१८७
  • सातारा / ७,७११ / ९,०९७
  • सांगली / ६,८१२ / ७,३२२
  • कोल्हापूर / १२,२३७ / १०,२१५
  • सोलापूर / १३,५८४ / १३,१५८
  • एकूण / ७२,५४५ / ५१,९७९
English
हिंदी सारांश
Web Title : Pune Graduate, Teacher Constituency Faces Voter Decline; Election Likely in December

Web Summary : Pune's graduate constituency sees a massive voter decrease of 1.15 lakh, teachers' constituency declines by 20,000. Limited competition is expected in the upcoming December 2026 elections. Voter registration impacted by fewer candidates from Mahayuti and Maha Vikas Aghadi. Election Commission data reveals significant voter drops across districts.