शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

सवलतींचा आढावा घेऊनच हॉटेलच्या वेळा वाढविण्याचा निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 6:55 AM

Corona virus Unlock: राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. या सवलतींच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि रेस्टाॅरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. या सवलतींच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि रेस्टाॅरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.  (The decision to extend hotel hours only after reviewing the concessions, Chief Minister Uddhav Thackeray made it clear )वर्षा येथील समिती सभागृहात शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील हॉटेल  व्यावसायिकांच्या प्रमुख संघटनांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा केली. या बैठकीस संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह टास्क फोर्सचे डाॅ. शशांक जोशी, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार,  डॉ. पी. व्ही शेट्टी, रवी शेट्टी, राकेश शेट्टी, सुकेश शेट्टी, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे वरीष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी, एफएचआरएआयचे गुरबक्षीस सिंग कोहली  आदी उपस्थित होते.  यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत करायचे आहेत. आपण पहिल्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यात मोकळ्या जागांवरील व्यवहारांवरील बंधने कमी केली आहेत. पण इनडोअर बाबींबाबत सावध पावले टाकावी लागतील. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मोठी गरज भासली. तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली, तर ऑक्सिजनची मागणी वाढू शकते, असे केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. आताही मोठी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांचा ऑक्सिजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येईल. निर्बंध शिथिलतेनंतर संसर्ग आणि रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाणार आहे. टास्क फोर्सचे डॉ. जोशी यांनी हॉटेल व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांचे लसीकरण, स्वच्छतागृहांची रचना याबाबत सूचना केल्या. सोमवारी टास्क फोर्स बैठक होणार असल्याने आम्ही पुढील निर्णयाच्या प्रतिक्षेत आहोत, असे आहारचे शिवानंद शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे