कुर्ल्यातील तरुणीचा मृत्यू

By Admin | Updated: March 12, 2015 05:05 IST2015-03-12T05:05:58+5:302015-03-12T05:05:58+5:30

फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली स्वाईन फ्लूची साथ मार्च महिन्यातही कमी झालेली नाही. बुधवार, ११ मार्च रोजी स्वाईन फ्लूमुळे कुर्ला येथे

The death of a Kurla girl | कुर्ल्यातील तरुणीचा मृत्यू

कुर्ल्यातील तरुणीचा मृत्यू

मुंबई : फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली स्वाईन फ्लूची साथ मार्च महिन्यातही कमी झालेली नाही. बुधवार, ११ मार्च रोजी स्वाईन फ्लूमुळे कुर्ला येथे राहणाऱ्या २७ वर्षीय मुलीचा स्वाईनमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील मृतांचा आकडा आठवर गेला असून मुंबई बाहेरील १५ रुग्णांचा आत्तापर्यंत स्वाईनमुळे मृत्यू झाला आहे.
कुर्ला येथे राहणाऱ्या मुलीला शनिवार, ७ मार्चला केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर रविवार, ८ मार्चला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. या मुलीच्या श्वसन यंत्रणेवर परिणाम झाला होता. तिचा ११ मार्चला मृत्यू झाला.
मुंबईत बुधवार, ११ मार्च रोजी स्वाईनचे ४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १९ पुरूष तर २२ महिलांचा समावेश आहे. ५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून ३६ जण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत आहेत. मुंबईबाहेरून ४ नवे रुग्ण उपचारासाठी आले आहेत. तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The death of a Kurla girl