शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पित्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

By admin | Updated: April 24, 2015 01:28 IST

पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून कुऱ्हाडीने वार करून मुलाला ठार केल्याची दुर्दैवी घटना तलासरी तालुक्यातील कुर्झे गावितपाडा येथे घडली.

तलासरी : पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून कुऱ्हाडीने वार करून मुलाला ठार केल्याची दुर्दैवी घटना तलासरी तालुक्यातील कुर्झे गावितपाडा येथे घडली. सुरेश लक्ष्मण धोडी (४५) असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने पत्नी ऊर्मिला आणि मुलगी अंजली यांनाही गंभीर जखमी केले असून, हल्ल्यानंतर तो पसार झाला. या घटनेमुळे गावितपाडा भागात हळहळ व्यक्त होत आहे.सुरेशच्या मनात पत्नी ऊर्मिला हिच्या चारित्र्याबाबत संशय होता. या कारणावरून तो तिला नेहमी मारहाण करीत असे. आईला मारहाण होत असल्याचे बघून मुलगा नितीन धोडी (१९) हा भांडणामध्ये पडत असल्याने त्याच्यावरही सुरेशचा राग होता. गुरुवारी पहाटे ३च्या सुमारास सुरेशने पत्नी ऊर्मिला व मुलगी अंजली यांना झोपेतून उठवून भाकरी बनवायला सांगितले. मायलेकी भाकरी बनवीत असतानाच सुरेश धोडी याने घराबाहेर झोपलेल्या नितीनवर कुऱ्हाडीने वार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. बाहेर काही आवाज आल्याने ऊर्मिला घराबाहेर आली. या वेळी सुरेशने तिच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. आपल्या बापाचा क्रूर अवतार बघून मुलगी अंजली घराबाहेर धावत सुटली तेव्हा तिच्यावरही त्याने कुऱ्हाडीने वार केला. सुरेशच्या घरातून आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले. तेव्हा सुरेश पळून गेला. जखमी ऊर्मिला आणि अंजली यांच्यावर सिल्व्हासा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तलासरी पोलिसात अंजलीने फिर्याद दाखल केली असून, घटनास्थळाला पोलीस अधिकारी हरी बालाजी धूम आणि उपविभागीय अधिकारी अभिजित शिवतरे यांनी भेट दिली. पोलीस सध्या फरार सुरेशचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)