शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

कबरीतून काढला दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 06:08 IST

आरेमध्ये बलात्कार झाल्यानंतर, विष पिऊन आत्महत्या करणाºया मुलाचा मृतदेह मंगळवारी कबरीतून काढण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

गौरी टेंबकर-कलगुटकर 
मुंबई : आरेमध्ये बलात्कार झाल्यानंतर, विष पिऊन आत्महत्या करणाºया मुलाचा मृतदेह मंगळवारी कबरीतून काढण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अत्यंत गुप्तता बाळगत हा मृतदेह पोलिसांनी जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविल्याचीही माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली.
आरेत ज्या दोन मुलांवर बलात्कार झाला, त्यातील दहा वर्षांच्या आसिफ (नावात बदल)चा १३ जुलै रोजी मृत्यू झाला. त्यानंतर, साकीनाक्यातील एका खासगी डॉक्टरकडून प्रमाणपत्र घेऊन, आसिफचे शव विहार लेकजवळील चाँद शाह बाबा कबरस्तानात दफन करण्यात आले. आपल्याप्रमाणे त्याच्यावरही अनैसर्गिक बलात्कार झाल्याचे मंगळवारी केईम रुग्णालयात मृत्यू झालेल्या सुनील (नावात बदल) ने त्याच्या पालकांना सांगितले होते. मात्र, आसिफच्या घरच्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याने, त्यांनी अजून तक्रार दाखल केलेली नाही. आवश्यक ती औपचारिकता पूर्ण करत, मंगळवारी आसिफचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात कबरस्तानातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. यावेळी त्याचे वडीलही हजर होते. सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले, ते दुपारी दीडच्या सुमारास पूर्ण झाल्याचे या अधिकाºयाने सांगितले. त्याचा मृत्यू कसा झाला? त्याच्यावर अत्याचार झाले होते का, याचे उत्तर शवविच्छेदन अहवालातून मिळेल. त्यानुसार, पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

सुनील आणि आसिफसोबत त्यांच्याच वयाचा अजून एक मित्र असायचा. हा प्रकार घडला, तेव्हा तो उत्तर प्रदेश या त्याच्या गावी गेला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातून त्याला घेऊन मुंबईकडे निघाले आहे. त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. सुनीलने आईला सांगितल्याप्रमाणे कोणीतरी ‘मुरारजी का लाडका’ त्याला त्या माणसाकडे घेऊन गेला होता ज्याने त्याच्यावर अत्याचार केले.