शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

डी.एस.कुलकर्णींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 2:39 AM

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांच्या थकवलेल्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम म्हणजेच ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. पोलीस कारवाईत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिल्याने डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांच्या थकवलेल्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम म्हणजेच ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. पोलीस कारवाईत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिल्याने डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डीएसके यांनी गुंतवणूकदारांचे एकूण २०० कोटी रुपये थकवले आहेत. त्यानुसार न्यायालयाने डीएसके यांना गेल्या सुनावणीत २०० कोटींपैकी ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याकरिता १५ दिवसांची मुदत दिली. १५ दिवसांत ५० कोटी रुपये भरले नाही, तर त्यांना दिलेले संरक्षण काढण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट बजावले होते. ही मुदत मंगळवारी संपली.मंगळवारच्या सुनावणीत डीएसकेंच्या वकिलांनी १५ दिवसांत रक्कम जमा करू शकलो नाही, असे न्यायालयाला सांगत रकमेची जुळवाजुळवी करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागितली. मात्र, न्या. साधना जाधव यांनी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार देत डीएसके यांना दिलेले अंतरिम संरक्षण काढून घेतले.याबाबत आधीचा आदेश स्पष्ट असून तुम्ही योग्य ती कारवाई करू शकता, असे निर्देश न्यायालयाने पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले. त्यामुळे आता डीएसके यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.गुंतवणूकदारांचे पैसे थकविल्याबद्दल डीएसके यांच्यावर पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी त्यांच्या मालमत्तांची सर्व कागदपत्रे जप्त केली असून, बँकांनाही डीएसकेंची खाती गोठविण्याचा आदेश दिला आहे.योग्य ती कारवाई करू शकता-आधीचा आदेश स्पष्ट असून तुम्ही योग्य ती कारवाई करू शकता, असे निर्देश न्यायालयाने पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले. त्यामुळे आता डीएसके यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणेHigh Courtउच्च न्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्टPoliceपोलिस