शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
4
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
5
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
6
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
7
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
8
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
9
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
10
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
11
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
12
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
13
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
14
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
15
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
16
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
17
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
18
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
19
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
20
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

Cyclone Nisarga:निसर्ग चक्रीवादळाचा रेल्वेलाही फटका; एकही श्रमिक ट्रेन धावली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 5:48 PM

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई शहर आणि उपनगरांना सतर्कतेचा इशारा दिला होता.

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बुधवारी मध्य रेल्वे मार्गावर एकही श्रमिक विशेष ट्रेन धावली नाही. यासह मध्य रेल्वे मार्गावरील 200 विशेष ट्रेनमधील काही ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई शहर आणि उपनगरांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मध्य रेल्वे प्रशासनाने देखील मजुरांसाठी चालविण्यात येणाऱ्या श्रमिक विशेष ट्रेन बुधवारी न चालविण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांने दिली. बुधवारी, हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम विशेष ट्रेन मनमाड-दौंड व्हाया पुणे-मिरज-लोंडा-मडगाव या मार्गे चालविण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दुसरीकडे अलिबागच्या किनारपट्टीवर दुपारी एकच्या सुमारास धडकलेलं चक्रीवादळ सध्या ठाणे, पालघर पट्ट्यात आहे. इथून ते पुढे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे.  वादळ मुंबईच्या बाजूनं थोडं पुढे सरकलेलं असलं तरीही हवामान विभागानं दिलेला धोक्याचा इशारा कायम आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असतील. निसर्ग चक्रीवादळामुळे सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम होता. शिवाय सातत्याने वाहत असलेल्या वाऱ्याचा वेगही कायम होता. दुपारी पावसाचा आणि वाऱ्याचा वेग वाढू लागला असतानाच ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. मुंबई शहर आणि उपनगरातील समुद्र किनारी राहत असलेल्या, पश्चिम किनारपट्टीवरील, धोकादायक व समुद्र किना-यानजीकच्या वस्त्यांतील नागरिकांचे स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा आतापर्यंत नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी निश्चित करण्यात होत्या. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्षात असलेल्या ५ हजारापेक्षा अधिक कॅमेऱ्यांद्वारे  घडामोडींवर नजर ठेवण्यात आली होती. पाणी साचण्याच्या संभाव्य ३०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले होते.

हेही वाचा

गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू, ३२ जखमी

Cyclone Nisarga: चक्रीवादळ अलिबागच्या किना-यावर धडकले; पुढचे २-३ तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात 

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण 

लडाख भारताचा अविभाज्य भाग, सीमेवर शांती महत्त्वाची; तिबेटच्या निर्वासित पीएमचा चीनवर हल्लाबोल

Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र 

Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका

Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा पावणे दाेन लाख लोकांना फटका बसणार?; 60 हजार जणांना स्थलांतरित करणार

टॅग्स :cycloneचक्रीवादळCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ