शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढण्याची मुदत वाढली!

By admin | Updated: September 3, 2015 23:58 IST

आता १५ सप्टेंबरपर्यंत काढता येईल पीक विमा, पण राज्याला फायदा काय?

अकोला : देशातील पाऊस व पिकांची स्थिती बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा काढण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पण, या पीक विम्याचा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फायदा काय, असा प्रश्न तज्ज्ञ शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे. पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील जवळपास ९ लाख शेतकर्‍यांनी ५0 कोटींच्यावर रक्कम भरू न पीक विमा काढला आहे. राज्यात ऑगस्ट अखेरपर्यंत १२७.८९ लाख म्हणजेच ९५ टक्के क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी शेतकर्‍यांनी केली. पण, सतत पावसाचा खंड पडल्याने पिकांचे नुकसान झाले. शेतकर्‍यांना दुबार-तिबार पिकांची पेरणी करावी लागली. त्यामुळे शासनाने ७ ऑगस्टपर्यंत पीक विम्याची मुदत वाढ केली होती. तथापि ही मुदत वाढ जाहीर करताना १ ते ७ ऑगस्टपर्यंत ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली. केवळ त्याच शेतकर्‍यांना पीक विमा मुदत वाढीचा लाभ घेता येणार होता. परिणामी ज्या शेतकर्‍यांनी या तारखेच्या अगोदर पेरणी केली पण, पीक विमा काढला नव्हता, त्यांचा हिरमोड झाला. आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली, त्यांना या पीक विम्याचा लाभ होईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, पावसाची अनिश्‍चितता बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक विमा काढण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पण, १ सप्टेंबरनंतर पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांना या पीक विम्याचा फायदा होणार असेल तर या राज्यात आता पेरणी करणारे शेतकरी उरले कुठे, असा प्रश्न तज्ज्ञ शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.