शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 21, 2014 22:39 IST

तापमान वाढीचा जबरदस्त फटका कृषी क्षेत्रला बसत असून याचा मोठा घातक परिणाम कृषी उत्पादनावर होत आहे.

पेण : तापमान वाढीचा जबरदस्त फटका कृषी क्षेत्रला बसत असून याचा मोठा घातक परिणाम कृषी उत्पादनावर होत आहे. एकंदरच पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. मृगाचा पाऊस बेताचाच झाल्याने कृषीक्षेत्रला जबरदस्त फटका बसल्यातच जमा आहे. प्रारंभीचा पाऊसच न पडल्याने जे पेरलंय ते उगवलंय खरं पण पाणी मागते झाल्याने उगवलेल्या रोपांनी आता राम म्हणण्यास सुरुवात केली आहे. धूळपेरणीच्या वाफ्यांना तग धरायला पाऊस नसल्याने शेतक:यांवर दुबार पेरणीचे संकट आवासून उभे ठाकलंय.
यंदाच्या खरीप हंगामात जेमतेम 93 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय. कृषी क्षेत्रसाठी हा धोक्याचा इशारा आहे. कमी पावसापेक्षाही मान्सूनचे आगमन व स्थिरावण्यास होणारा उशिर, पावसाचे असमान वितरण आणि त्यातील पडणारे खंड ही शेतीक्षेत्रसाठी चिंतेची बाब आहे. शेतामध्ये पिक उत्पादनाच्या दृष्टीने पेरणीच्या हंगामाची सुरुवातीची वेळ साधण्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करीत असतो. रायगडातील प्रारंभीची धूळपेरणी पूर्ण होवून काही काही मृगधारा बरसल्या ख:या परंतु त्यामध्ये स्थिरता नसल्याने मृगाचा पाऊस जेमतेम पडला. त्यानंतर तापमानवाढीचा जबर फटका उगवलेल्या रोपांना बसत आहे. गेले आठ दहा दिवस पावसाने दडी मारल्याने नर्सरी रोपे सूर्याच्या कडक उन्हात तग धरू शकणार नाहीत. मृग नक्षत्र संपून आद्र्रा नक्षत्रची पहाट उजाडणार आहे. पण जाणारे नक्षत्र येणा:या नक्षत्रला साथ देत नसल्याने आभाळ निरभ्र आहे. हवेत गारवा नाही. दिवसभर कडक उन्हे पडतात. अशा कठीण परिस्थितीत खरीपाचा हंगाम मान्सूनने दडी मारल्याने संकटाच्या सीमारेषेवर उभा आहे.
शेतीचे यंदा खरीप हंगामाचे आपत्कालीन नियोजन शेतक:यांना समजावून सांगण्यात व त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्याचा फारसा प्रय} अद्याप कृषी विभागाकडून झालेला नाही. पावसाची समस्या अधिक उग्र झाल्यास शेतक:यांच्या खरीप हंगाम वाचविण्यासाठी पिक बदल करण्याची परिस्थितीही रायगडात नाही. निव्वळ भाताचे उत्पादन होणारी शेती असल्याने कमी दिवसात उत्पादन घेणारी बियाणो यासाठी कृषी विभागाची जनजागरण मोहिम हाती घेणो पुढील काही दिवसात  अपरिहार्य आहे. राज्य व केंद्रीय पातळीवरून मान्सूनच्या या अपत्तीदर्शक संभाव्य परिस्थितीचे अवलोकन करणो गरजेचे ठरणार आहे. कारण शेती, उद्योग, ग्राहक या तीन घटकांचे भवितव्य मान्सूनवर अवलंबून आहे. 
मान्सून या घटकाचा जीवनदाता आहे. मान्सूनचा फटका जिथे जिथे बसतो तिथे याला जबर फटका बसतो. रायगडाची शेती पावसाच्या पाण्यावर आधारलेली असल्याने जो पेरा उगवला आहे तो मान्सून अभावी टिक णार नाही. संकटाचे काळे ढग शेतक:यांच्या हृदयावर गहिरे आघात करीत आहेत. प्रारंभीचा पेरा पावसाअभावी करपून गेला आणि जाणार या भीतीमुळे शेतकरी अर्धमेला झालाय. 
दुबार पेरणीसाठी नव्याने बियाणो खरेदी करायची, त्यासाठी लागणारा पैसा व पावसाचे लहरी चित्र अशा विचित्र परिस्थितीमुळे शेतकरीवर्ग दुबार पेरणीच्या अस्मानी संकटामुळे कासावीस झाला आहे. पावसाचे आगमन लवकर व्हावे अशीच प्रार्थना  शेतकरी करीत आहेत.  (वार्ताहर)
 
4रायगडातील प्रारंभीची धूळपेरणी पूर्ण होऊन काही  मृगधारा बरसल्या ख:या परंतु त्यामध्ये स्थिरता नसल्याने मृगाचा पाऊस जेमतेम पडला. त्यानंतर तापमानवाढीचा जबर फटका उगवलेल्या रोपांना बसत आहे. गेले आठ दहा दिवस पावसाने दडी मारल्याने नर्सरी रोपे सूर्याच्या कडक उन्हात तग धरू शकणार नाहीत.
 
4रायगडाची शेती पावसाच्या पाण्यावर आधारलेली असल्याने जो पेरा उगवला आहे तो मान्सूनअभावी टिकणार नाही. प्रारंभीचा पेरा पावसाअभावी करपून गेला आणि जाणार या भीतीमुळे शेतकरी अर्धमेला झालाय. दुबार पेरणीसाठी नव्याने बियाणी खरेदी करायची तर त्यासाठी लागणारा पैसा आणि पावसाचे लहरी चित्र यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे.