शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड कलाकारांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: February 6, 2015 01:54 IST

फिर्याद घ्यायला नकार दिल्याची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच गुरुवारी सकाळी पुण्यात बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पुणे : यु ट्युब या व्हिडीओ सर्च इंजीनद्वारे मुंबईत आयोजित ‘एआयबी’ ‘नॉक आऊट रोस्ट आॅफ अर्जुन कपूर अ‍ॅण्ड रणबीर कपूर या कार्यक्रमात अश्लील संभाषण झाल्याची फिर्याद घ्यायला नकार दिल्याची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच गुरुवारी सकाळी पुण्यात बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या कार्यक्रमाचे आयोजक, दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता अर्जुन कपूर, रणबीर कपूर, अभिनेत्री दिपीका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह तब्बल चौदा जणांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, यु ट्युबवरुन हे वादग्रस्त व्हिडीओ काढून टाकण्यात आले आहे.याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक वजीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. यु ट्युबद्वारे २० डिसेंबर २०१४ रोजी मुंबईमधील सरदार पटेल सभागृहामध्ये एआयबी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. याचे तीन व्हिडीओ २९ जानेवारी २०१५ रोजी यु ट्युबवर अपलोड करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांनी अर्वाच्च शब्द उच्चारत अश्लील हावभाव केले. त्यामुळे ही बाब सार्वजनिकदृष्ट्या गुन्ह्यास पात्र असल्याने नागरिक या नात्याने शेख यांनी फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद उगले यांनी नकार दिला होता.संबंधित व्हिडीओ लोकमतला मिळाले होते. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याची बातमी गुरुवारी प्रसिद्ध होताच गुरुवारी सकाळी पोलिसांनी शेख यांची फिर्याद दाखल करुन घेतली. सहभागी कलाकारांसह यु ट्युब, आयोजक, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्यासह अबीश मॅथ्यू, आदिती मित्तल, तन्मय भट्ट, सिमरन खंबा, आशिष शक्य, रोहन जोशी, राजीव मसंद, रघू राम, करण जोहर, रणबीर कपूर, अर्जुन कपूर, दिपीका पदकोण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.काय होऊ शकते शिक्षाकलम २९२, २९४ नुसार तीन ते पाच वर्षे आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ व ६७ अ नुसार तीन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यासाठी आवश्यक असलेले व्हिडीओची सीडी पुरावे म्हणून शेख यांनी सादर केली आहे.