शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

२००० नंतरच्या झोपड्या पाडण्याचे न्यायालयाचे आदेश

By admin | Updated: December 16, 2014 03:39 IST

अनधिकृत झोपड्यांनाही पाणी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला सोमवारी दिले़ हा पाणी पुरवठा करण्यासाठीचे धोरण येत्या फेब्रुवारीपर्यंत निश्चित करा

मुंबई : अनधिकृत झोपड्यांनाही पाणी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला सोमवारी दिले़ हा पाणी पुरवठा करण्यासाठीचे धोरण येत्या फेब्रुवारीपर्यंत निश्चित करा व २००० नंतरच्या झोपड्या पाडा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे़न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ घटनेने झोडपडीधारकांनाही समान हक्काचे संरक्षण दिले आहे़ असे असताना मुंबईतील सर्वसामान्य नागरिक व झोपडीधारकांमध्ये फरक केला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने पालिकेला सुनावले़यासाठी पाणी हक्क समितीने याचिका केली होती़ १ जानेवारी १९९५ नंतरच्या झोपडीधारकांना पाणी कनेक्शन देऊ नका, असे परिपत्रक ४ मार्च १९९६ रोजी नगर विकास विभागाने काढले़ त्याआधारावर महापालिकेने १९९५ नंतरच्या झोपडीधारकांना पाणी देणे बंद केले़ परिणामी सन २००० पर्यंतच्या सुमारे २ लाख ८४ हजार ३०९ झोपडीधारक कुटुंबियांना अधिकृत पाणी मिळत नाही़ यामुळे पाणी आणण्यासाठी दुर जावे लागते़ लहान मुलांनाही पाणी भरावे लागते़ हे लक्षात घेता किमान घराच्या वापरासाठी तरी पालिकेने या झोपडीधारकांना अधिकृत पाणी कनेक्शन द्यावे व नगर विकास विभागाचे परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती़ याला आधी पालिकेने विरोध केला होता़ न्यायालयाच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना समितीचे सदस्य म्हणाले, न्यायालायने पालिकेला १५ फेब्रुवारीपर्यंत मागेल त्याला पाणी कसे देणार याबाबत आकृतीबंध प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याचा दावा समितीने केला आहे. पालिका न्यायालयात सादर करणाऱ्या प्रस्तावावर समिती लक्ष ठेवणार आहे.