शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

ऊसविरुद्ध कापूस-सोयाबीन!

By admin | Updated: April 1, 2015 02:21 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेताच विधानसभेत मंगळवारी प्रचंंड गदारोळ झाला.

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेताच विधानसभेत मंगळवारी प्रचंंड गदारोळ झाला. उसाला मदत देता मग सोयाबीन, कापूस, धान पीक उत्पादकांनाही मदत द्या, अशी मागणी सत्ताधारी बाकावरील सदस्यांनीच केली. दोन्ही बाजूंचे सदस्य वेलमध्ये उतरले. घोषणाबाजी, गदारोळ झाला आणि अखेर अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज रेटून नेले. यानिमित्ताने ऊसविरोधात कापूस असा संघर्ष पाहायला मिळाला.आज सभागृहात गृह विभागासह शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विभागांवर चर्चा होती. नागपुरात मोका लावलेले कैदी तुरुंगातून पळाले, त्या पार्श्वभूमीवर चर्चा टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कापूस शेतकऱ्यांचे नाव पुढे करीत गदारोळ घातल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला.उसाच्या प्रश्नावर गेली तीन दिवस सभागृहात चर्चा सुरू होती. त्यासाठी सकाळची वेळ राखून ठेवण्यात आली होती. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उसाच्या प्रश्नावर सरकार गंभीर आहे. अधिवेशन संपण्याच्या आत यावर तोडगा काढू, असे उत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादीने प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न उपस्थित केला. जर या प्रश्नावर निर्णय होणार नसेल तर आम्हाला सभागृह चालवण्यात रस नाही. कामकाज  बंद करा, आधी हा प्रश्न निकाली काढा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला आणि नंतर तो दिवसभर सुरू राहिला.दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीतील निर्णय सभागृहात जाहीर करण्यासाठी निवेदन केले, तेव्हा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत कोणाला बोलू दिले नाही. कापसाच्या प्रश्नावर आधी निर्णय घ्या, अशी ते मागणी करू लागले. त्यानंतर अध्यक्षांनी अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा पुकारली. विखे- पाटील यांनी चर्चेला सुरुवातही केली; पण अचानक महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मागण्या मंजूर करण्याची मागणी केली. अध्यक्षांनी लगेच मागण्या मंजूर झाल्याचे घोषित करून सभागृहाची बैठक दिवसभरासाठी तहकूब करून टाकली.