शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus बुलडाण्याच्या हवालदाराचा चक्क गृहमंत्र्यांशी पंगा; मध्यरात्री झोपेतून उठवून हुज्जत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 07:04 IST

हवालदाराची नियंत्रण कक्षात उचलबांगडी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या विषाणूला थोपविण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांकडून काही ठिकाणी अतिरेक होत असल्याची चर्चा सुरु असताना दस्तूरखूद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही त्याचा प्रत्यय आला आहे. एका पोलीस हवालदाराने चक्क मध्यरात्री दीड वाजता त्यांना झोपेतून उठवून त्यांच्याशी फोनवरून हुज्जत घातली. मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाची गाडी अडविण्यावर हा वाद झाला. या अरेरावीबद्दल पोलीस हवालदाराची बुलढाणा पोलीस नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे. रवींद्र पोळ असे या हवालदाराचे नाव आहे, आठ दिवसात प्राथमिक चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात कोरोनाच्या प्रादुभार्वाला रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पाडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यासाठी पोलीस महामार्गाबरोबरच प्रमुख चौक आणि रस्त्यावर तैनात आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी स्वीय सहाय्यक वैभव तुमाने हे २९ मार्चला रात्री नागपूरहून मुंबईला येण्यासाठी निघाले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील चिखली रणथम येथील आंतरजिल्हा सीमावर्ती चेकपोस्ट नाक्यावर पोलिसांनी मोटार अडविल्यानंतर तुमाने यांनी आपली ओळख सांगून आवश्यक कामासाठी मुंबईला जात असल्याचे सांगितले. मात्र हवालदार पोळ यांनी त्याला आक्षेप घेत वाद घातला. वादावादी वाढतच राहिली. बराचवेळ सांगूनही मोटार सोडत नसल्याने त्यांनी अखेर गृहमंत्र्यांना मोबाईलवर फोन लावला. त्यावेळी रात्रीचे दीड वाजले होते. तुमाने यांनी मोबाईलचा स्पिकर सुरु ठेऊन पोळ यांना बोलण्यास दिले. हवालदार पोळ यांनी त्यांच्याशी उद्धटपणाची भाषा वापरली. अखेर खडसावल्यानंचर पोळ यांनी तुमाने यांची मोटार सोडण्यात आली.

गृहमंत्र्यांनी याबाबत बुलढाणाचे पोलीस प्रमुख डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांना सूचना दिल्या. त्यानुसार पोळ यांची बदली करण्यात आली.हवालदाराचे वर्तन उद्धटपणाचेराज्यात सध्या बिकट स्थिती असताना पोलिसांनी नागरिकांशी संयमाने वागावयास हवे. संबंधित पोलिसांचे वर्तन खात्याला अशोभनीय होते. त्याबाबत पोलीसप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. ते योग्य ती कारवाई करतील.- अनिल देशमुख, गृहमंत्री

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या