शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : काेराेना रुग्णांच्या मदतीला रेल्वे आली धावून, राज्यासाठी १७६ आयसोलेशन कोचची साेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 07:03 IST

CoronaVirus News: गेल्या वर्षी कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले. यापैकी संपूर्ण मध्य रेल्वे विभागाने ४८२ आणि पश्चिम रेल्वे विभागाने ३८६ आयसोलेशन कोच तयार केले.

मुंबई : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वेच्या आयसोलेशन कोचचा वापर करता येईल. देशात साडेपाचशेहून अधिक, तर राज्यात १७६ आयसोलेशन कोच उपलब्ध असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.गेल्या वर्षी कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले. यापैकी संपूर्ण मध्य रेल्वे विभागाने ४८२ आणि पश्चिम रेल्वे विभागाने ३८६ आयसोलेशन कोच तयार केले. प्रत्येक डब्यात शेवटच्या पार्टिशनमधून दरवाजा, प्रत्येक डब्याच्या शेवटी एक इंडियन स्टाइल टॉयलेटचे रूपांतर बाथरूममध्ये करण्याची संरचना तयार केली आहे.गेल्या वर्षी काेराेनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मध्य रेल्वेकडून ४८२ आयसोलेशन कक्ष तयार केले होते. मात्र राज्य सरकारकडून आयसोलेशन कक्षाची मागणी न केल्याने कोच पडून होते. दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाला श्रमिक रेल्वे, इतर मेल, एक्स्प्रेससाठी कोच कमी पडू लागले. त्यामुळे रेल्वे मंडळाच्या सूचनेनुसार श्रमिक विशेष गाड्या वाढविण्यासाठी आयसोलेशन कोचचे रूपांतर पुन्हा नियमित प्रवासी डब्यात केले. त्यामुळे आता मध्य रेल्वेकडे केवळ ४८ कोच उपलब्ध असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.पश्चिम रेल्वेचा विचार केल्यास सद्य:स्थितीत पश्चिम रेल्वेकडे मुंबई विभागात १२८ आयसोलेशन कोच आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर विभागात ४८ आयसोलेशन कोच आहेत.

एका डब्यात २४ खाटामुंबई विभागात १२८ आयसोलेशन कक्ष तयार आहेत. एका डब्यात २४ खाटा आहेत. राज्य सरकारने आयसोलेशन कक्षाची मागणी केल्यास त्यांना ते वापरण्यासाठी देण्यात येतील.- आलोक कंसल, महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrailwayरेल्वे