CoronaVirus News : चिंता वाढतेय! राज्यात १६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, तर ३२८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 21:21 IST2020-08-29T21:18:16+5:302020-08-29T21:21:53+5:30
राज्यातील कोरोना रुग्णांचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे.

CoronaVirus News : चिंता वाढतेय! राज्यात १६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, तर ३२८ जणांचा मृत्यू
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज १६,८६७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकणू रुग्णांची संख्या ७,६४,२८१ झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे. तसेच, राज्यात आज ३२८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २४ हजार १०३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१५ % एवढा आहे.
आज ११,५४१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५,५४,७११ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४०,१०,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,६४,२८१ (१९.०५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,१२,०५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,५२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
16,867 new #COVID19 cases, 11,541 discharges and 328 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 7,64,281 including 1,85,131 active cases, 5,54,711 recoveries and 24,103 deaths: State Health department pic.twitter.com/M3rF0IULAI
— ANI (@ANI) August 29, 2020
राज्यात आज ३२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३१, ठाणे २०, नवी मुंबई ९, मीरा भाईंदर ९, रायगड २१, नाशिक १६, जळगाव २०, पुणे ४३, पिंपरी चिंचवड मनपा ४, सोलापूर ९, सातारा ६, कोल्हापूर १५, सांगली २३, औरंगाबाद ३, नागपूर ३१ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३२८ मृत्यूंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू हे ठाणे १४, पालघर ४, नाशिक ३, औरंगाबाद २, कोल्हापूर २, लातूर २, नागपूर २, सांगली २, बीड १, जळगाव १,पुणे १, रत्नागिरी १ आणि सातारा १ असे आहेत.
आणखी बातम्या...
काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...
धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं
- अॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर
- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा
- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार
- CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...
- आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार