काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 06:04 PM2020-08-29T18:04:58+5:302020-08-29T19:07:30+5:30

एकदा पैसे भरल्यानंतर डिलर आपल्याला इनव्हॉइससोबत नंबरसाठी एक अनोखा पोर्टिंग कोड (UPC) पाठवेल.

what is vip phone number check how to get it | काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

Next
ठळक मुद्देबेसिक व्हीआयपी नंबर्ससाठी किंमत सहसा 1000 ते 1,500 रुपये ठेवली जाते, परंतु जर तुम्हाला प्रीमियम व्हीआयपी क्रमांक हवा असेल तर त्यांची किंमतही लाखो रुपायांच्या घरात असते.

नवी दिल्ली : बर्‍याच लोकांना व्हीआयपी (VIP) मोबाईल नंबर हवा असतो. हे व्हीआयपी मोबाइल नंबर्स युनिक असून लक्षात ठेवण्यास सोपे असतात. मात्र, हे नंबर्स  सहज मिळत नाहीत. यासाठी किंमत देखील मोजावी लागते.

दरम्यान, हे व्हीआयपी नंबर्स एका सीक्वेंसमध्ये असतात, जे बाजारात बॅचमध्ये रिलीज केले जातात. उदाहरणार्थ, जर टेलिकॉल सर्व्हिस प्रोव्हायडरने 9100000000 पासून 9200000000 पर्यंत नवीन बॅच नंबर्स रिलीज केले, तर यामध्ये 9111111111 सारखे काही निवडक व्हीआयपी नंबर्स असतील. मार्केटमध्ये येताच अशा व्हीआयपी नंबर्सची वेगाने विक्री केली जाते. या नंबर्ससाठी किंमतही जास्त ठेवली जाते. मात्र, आता यापैकी काही रिसेलर्स कोरोना विषाणूमुळे ऑनलाईन सुद्धा विक्री करीत आहेत.

तुम्ही या व्हीआयपी मोबाईल नंबर प्रोव्हायडर्स ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या खासगी वेबसाइट किंवा Olx  आणि Quikr द्वारे शोधू शकतात. या विक्रेत्यांकडे व्हीआयपी नंबर्सची लिस्ट असते. या लिस्टमधील तुम्ही आपल्या आवडीची संख्या निवडू शकता. बेसिक व्हीआयपी नंबर्ससाठी किंमत सहसा 1000 ते 1,500 रुपये ठेवली जाते, परंतु जर तुम्हाला प्रीमियम व्हीआयपी क्रमांक हवा असेल तर त्यांची किंमतही लाखो रुपायांच्या घरात असते.

एकदा पैसे भरल्यानंतर डिलर आपल्याला इनव्हॉइससोबत नंबरसाठी एक अनोखा पोर्टिंग कोड (UPC) पाठवेल. UPC मिळाल्यानंतर तुम्हाला टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल आणि तेथे जाऊन UPC व तुमची कागदपत्रे द्यावी लागतील. यानंतर, तुम्हाला एक सिम कार्ड देण्यात येईल, ते तीन दिवसांत अॅक्टिव्ह होईल. व्हीआयपी सिमसाठी वेगळीच रिगनिंग देखील केली जाते. या परिस्थितीत खूप सावध राहावे लागते. 

आणखी बातम्या...

धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

Web Title: what is vip phone number check how to get it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.