CoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी! राज्यात 22,084 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 10 लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 09:08 PM2020-09-12T21:08:22+5:302020-09-12T21:24:16+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाखांवर पोहोचला आहे.

CoronaVirus Marathi News The total number cases Maharashtra rises to 10,37,765 | CoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी! राज्यात 22,084 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 10 लाखांवर

CoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी! राज्यात 22,084 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 10 लाखांवर

Next

मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 46 लाखांचा टप्पा पार केला असून 77 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाखांवर पोहोचला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 10,37,765 वर गेली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी (12 सप्टेंबर) कोरोनाचे 22,084 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 391 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 10,37,765 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल सात लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 7,28,512 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा

राज्यातील विविध रुग्णालयात 2,79,768 जणांवर उपचार सुरू आहे. तर अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशातही कोरोना लसीवर काम सुरू आहे. याच दरम्याने स्वदेसी लसीसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात विकसित होत असलेल्या भारत बायोटेक कंपनीच्या Covaxin बाबत आनंदाची माहिती मिळत आहे. 

स्वदेशी लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने मोठी घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. बायोटेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट देखील केलं आहे. माकडांवर केलेल्या लशीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली दिसून आली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर मिळून कोवॅक्सीन विकसित करत आहे.

जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत

कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन केलं जात आहे. सध्या 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन सुरू आहे. लस विकसित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत.  मानवी शरीरातील SARS-CoV-2 ओळखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आपल्या शरीरातील पेशींवर ACE-2 रिसेप्टर असतात. जे व्हायरसवर असलेल्या स्पाइक प्रोटीनचे लक्ष्य असतात. व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतात. शरीरात दाखल झाल्यानंतर व्हायरस रेप्लिकेट होतात आणि संसर्ग शरीराच्या इतर भागात पोहचतो. या व्हायरसशी लढण्यासाठी आपल्या शरीरात अँटीबॉडी आणि टी-सेल असतात. शरीरात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणं हे लसीचं काम असतं.

महत्त्वाच्या बातम्या

"ही तर राज्यपुरस्कृत दहशत, आरोपींची 10 मिनिटांत सुटका", फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 17 धोकादायक अ‍ॅप्स, फोनमधून करा डिलीट नाहीतर...

CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत

...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

CoronaVirus News : लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा 

Web Title: CoronaVirus Marathi News The total number cases Maharashtra rises to 10,37,765

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.