"ही तर राज्यपुरस्कृत दहशत, आरोपींची 10 मिनिटांत सुटका", फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 06:51 PM2020-09-12T18:51:35+5:302020-09-12T19:06:01+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. हे निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे. 

bjp devendra fadnavis says its very wrong kind of state sponsored terror situation | "ही तर राज्यपुरस्कृत दहशत, आरोपींची 10 मिनिटांत सुटका", फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

"ही तर राज्यपुरस्कृत दहशत, आरोपींची 10 मिनिटांत सुटका", फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Next

नवी दिल्ली - कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी समता नगर पोलिसांनी सहा शिवसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. यावरून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. हे निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीस सध्या बिहारमध्ये आहेत. शनिवारी (12 सप्टेंबर) एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. फडणवीस यांनी ही तर राज्यपुरस्कृत दहशत असल्याचा टोलाही शिवसेनेला लगावला. "महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी ट्विटरद्वारे उद्धव ठाकरेंना हे गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं. लोकांना अटक करणं आणि दहा मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

"महाराष्ट्रात यापूर्वी आपण अशा प्रकारचं वातावरण कधीही पाहिलं नाही" असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 
देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही ट्विट करुन ही घटना अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. केवळ व्हॉट्सअपवर आलेला मेसेज फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकाऱ्याला या गुंडांनी मारले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अशा घटना रोखल्या पाहिजेत असं म्हटलं होतं. या गुंडावर कठोर कारवाई करुन त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. 

"शिवसैनिकांनीच मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा", 'त्या' अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. त्यामुळे काही शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली. शर्मा यांची कन्या शीला यांनी वडिलांवर झालेल्या हल्ल्यासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. एक कार्टून फॉरवर्ड केल्याने माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या. शिवसेनेच्या काही लोकांनी त्यांच्यावर हल्लाही केला असं म्हटलं आहे. 

"राज्यात माणूसकी नावाची गोष्टच उरलेली नाही, राष्ट्रपती राजवट लागू करा"

शीला यांनी पोलीस घरी आले आणि त्यांनी वडिलांना सोबत येण्यासाठी जबरदस्ती केली. आम्ही हल्ल्याप्रकरणी एफआरआय नोंदवला आहे. राज्यात माणूसकी नावाची गोष्टच उरलेली नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे असं देखील शीला यांनी म्हटलं आहे. भाजपाचे कांदिवली पूर्व येथील आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करुन शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शिवसेनेचे कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 65 वर्षाच्या मदन शर्मा नावाचे माजी नौदल अधिकारी कांदिवली पूर्व येथे ठाकूर कॉम्प्लेक्स येथे राहतात.

महत्त्वाच्या बातम्या

गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 17 धोकादायक अ‍ॅप्स, फोनमधून करा डिलीट नाहीतर...

CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत

...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

CoronaVirus News : लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा 

"शिवसैनिकांनीच मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा", 'त्या' अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

Web Title: bjp devendra fadnavis says its very wrong kind of state sponsored terror situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.