शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

Corona virus : राज्यभरातच होईना कोरोनामुक्त रुग्णांचे ‘अपडेट’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 11:40 AM

पुणे सर्वात मागे तर मुंबईची आघाडी

ठळक मुद्देप्रामुख्याने पुण्यासह ठाणे व नागपुर जिल्ह्यांमधील आकड्यांमध्ये मोठी तफावत

पुणे : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पोर्टलवर अद्ययावत करण्यात राज्यभरातील काही जिल्हे पिछाडीवर आहेत. त्यामध्ये सर्वात मागे पुणे जिल्हा असून सुमारे २० हजार रुग्णांची तफावत आढळून येत आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या दोन दिवसांपुर्वीच्या एका परिपत्रकामध्ये सुमारे १ लाख रुग्णांची माहिती अद्ययावत नसल्याची कबुली दिली आहे. हे आकडे अद्ययावत झाल्यास राज्याचा कोरोनामुक्त रुग्णांचा दर सध्याच्या ७५ टक्क्यांवरून ८० टक्क्यांच्या पुढे जाईल.            केंद्र सरकारने देशभरातील प्रत्येक कोरोना बाधित रुग्णांची सर्व माहिती अद्ययावत करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल व अ‍ॅप तयार केले आहे. प्रत्येक कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालयांनी या पोर्टलवर रुग्णांची सर्व माहिती रिअल टाईम अद्ययावत करणे अपेक्षित आहे. या पोर्टलवरील माहितीच केंद्र सरकार व राज्य सरकारकडून अधिकृत मानली जाते. हीच माहिती जगभरात पोहचते. पण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची माहिती अद्ययावत करण्यात हात आखडा घेतला जात असल्याचे चित्र आहे.         प्रामुख्याने पुण्यासह ठाणे व नागपुर जिल्ह्यांमधील आकड्यांमध्ये मोठी तफावत दिसत आहे. पुणे जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २१ सप्टेंबरला जिल्ह्यात सुमारे ४२ हजार रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. पण राज्य अहवालात हा आकडा ६२ हजार देण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी हा आकडा ७४ हजारांच्याही पुढे होता. व्यास यांच्या आदेशानंतर त्यात सुधारणा झाल्याचे दिसते. ठाणे जिल्ह्यातही जवळपास ११ हजारांची तफावत दिसून येत आहे. तर नागपुरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण राज्य अहवालात दुपटीने अधिक आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे ९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक, औरंगाबाद, नगर, सांगली यांसह अन्य काही जिल्ह्यांतील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्याही राज्य अहवालात अधिक दिसून येत आहे.----------------कोरोनामुक्तीचा दर ८० टक्क्यांच्या पुढेसर्व जिल्ह्यांनी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची माहिती अचूक नमुद केल्यास राज्याचा कोरोनामुक्त रुग्णांचा दर ८० टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो. सध्या राज्य अहवालानुसार हा दर २१ सप्टेंबरला सुमारे ७५ टक्के एवढा होता. राज्य अहवालानुसार राज्यात यादिवसापर्यंत एकुण रुग्णसंख्या १२ लाख २४ हजार झाली असून त्यापैकी सुमारे पावणे तीन लाख रुग्ण उपचार घेत आहेत.-----------राज्यातील काही जिल्ह्यांतील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची स्थिती (दि. २१ सप्टेंबर)जिल्हा                       जि. अहवाल                 राज्य अहवालपुणे                            ६२,७८५                      ४२,१८२ठाणे                           १८,५९८                     २९,७७९नाशिक                       ९,६२८                       १४,३१२नागपुर                       ९,४६३                       १८,४९१औरंगाबाद                   ५,९२०                       ८,७३८अहमदनगर                 ४,१९७                      ८,५२४सांगली                       ९,२२३                      १०,६४१ 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारRajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल