शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिष शिक्षणात सुसूत्रीकरण यावे

By admin | Updated: August 22, 2014 00:11 IST

‘‘कोणीही उठतं आणि वर्षभर थोडसं ज्योतिषशास्त्र शिकतो व ज्योतिषी म्हणून पाटी लावतो. यामुळे ज्योतिषशास्त्रचीच प्रतिमा खराब होते. त्यासाठी ज्योतिष शिक्षणाचे सुसूत्रीकरण व्हायला हवे.

पुणो : ‘‘कोणीही उठतं आणि वर्षभर थोडसं ज्योतिषशास्त्र शिकतो व ज्योतिषी म्हणून पाटी लावतो.  यामुळे ज्योतिषशास्त्रचीच प्रतिमा खराब होते. त्यासाठी ज्योतिष शिक्षणाचे सुसूत्रीकरण व्हायला हवे. शिक्षणाचा कालखंड, पदवी, अभ्यासक्रम, पाठय़पुस्तक, टक्केवारी हे निश्चित करणो गरजेचे आहे,’’ असे मत ज्येष्ठ ज्योतिर्विद डॉ. वासुदेव जोशी यांनी व्यक्त केले. 
भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते झाले. या वेळी जोशी अध्यक्षस्थानी होते. फ्युचर पाईंट दिल्लीच्या आभा बन्सल, स्वागताध्यक्ष सुनंदा राठी, ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे, पुष्पलता शेवाळे, कार्याध्यक्ष नवीनकुमार शहा  उपस्थित होते. चंद्रपूरचे ज्योतिर्विद गो. बा. राजकोंडावर यांना ग्रहांकित जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. 
रघुवीर खटावकर लिखित किमयागार राहू, आनंददायी शुक्र, सत्ताधीश शनी, देवांचे गुरू ब्रहस्पती, प्र. सु. आंबेकर लिखित नक्षत्रज्योती, गृह ज्योतिष, राशी ज्योतिष, निवडक ग्रहांकित, मेष ते मीन लगA, मोहन फडके लिखित मंत्रशास्त्रद्वारे रोगमुक्ती, वि. ह. कुलकर्णी लिखित तान्हुल्यांचे शिल्पकार, रा. रा. कुलकर्णी लिखित अंक ज्योतिष, भाऊसाहेब चाकूरकर लिखित नाडी ज्योतिष, उदयराज सहानी लिखित कुंडली रहस्य दर्शन, सुहास डोंगरे लिखित शनी रवीचा चक्रव्यूह, सुमती सावंत लिखित कृष्णमूर्ती पद्धती एक मॅजिक, कराड वैभव यांचा विशेषांकांचे प्रकाशन झाले.  (प्रतिनिधी)
 
4जोशी म्हणाले, ‘‘ज्योतिषशास्त्रचा प्रचार फार झाला आहे. मात्र, आता त्याची प्रतिमा प्रतिष्ठेची करण्यासाठी प्रय} करायला हवा. ज्योतिष हे केवळ शास्त्र नसून विद्या आहे. त्याला अध्यात्माची जोड मिळाली, की त्याची विद्या होते. पूर्वीचे लोक जे बोलत ते खरे व्हायचे. कारण त्यांच्या भविष्याला अध्यात्माची जोड होती. त्यामुळे ज्योतिर्विद्येच्या अभ्यासक्रमात अध्यात्म, वेद, उपनिषद तसेच मानसशास्त्र या विषयांचाही समावेश असणो आवश्यक आहे.’’ त्याचप्रमाणो ज्योतिषशास्त्रत संशोधनाची आवश्यकता असून भालचंद्र विद्यापीठ हे त्याचे केंद्रस्थान बनावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 
ज्योतिषशास्त्रच्या सार्थकतेने विचार करताना काही कमतरता जाणवतात. सध्याचा काळ आणि जुना काळ यात फार फरक आहे. त्यामुळे काळाप्रमाणो बदल करणो आवश्यकच आहे. जुनेच मापदंड अद्यापही लागू होतील असे नाही. यासाठी अधिक संशोधन होणो आवश्यक आहे. तसेच जे शोध लावले आहेत ते मोकळेपणाने स्वीकारणो अत्यंत महत्त्वाचे आहे.
- आभा बन्सल, फ्युचर पाईंट दिल्ली
 
ज्योतिष ही समाजाला उपयुक्त अशी विद्या असल्याने महाराष्ट्रात अनेक संस्था ज्योतिष शिकविण्याचे कार्य करीत आहेत. हा उपक्रम चांगला असून, सर्व संस्थांमध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम सारखाच असेल, तर या शास्त्रची उपयुक्तता वाढेल.
- डॉ. शिवाजीराव कदम,
कुलगुरू, भारती विद्यापीठ