शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अन् कार्यकर्त्यांसाठी केली लातूरसाठी विशेष ट्रेनची सोय

By admin | Updated: June 3, 2014 22:32 IST

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि राज्यात एकच शोककळा पसरली.

मुंबई - भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि राज्यात एकच शोककळा पसरली. त्यांच्या कार्यकर्त्यांना तर या घटनेचा जबर धक्का बसला. मुंडे यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईत अंत्यदर्शनासाठी आणल्यानंतर ते परळी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार होते. त्यामुळे मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी परळी येथेही जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मुंबई भाजपतर्फे कार्यकर्ते आणि मुंबईत वास्तव्यास असलेल्या बीड, लातूरवासियांसाठी विशेष ट्रेनची सोय सीएसटी येथून करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मध्य रेल्वेशी संपर्क साधण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून सीएसटी-लातूर विशेष ट्रेन रात्री १0.५0 वाजता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांचा मोठा लोंढाच जाणार असल्याचा अंदाज असल्याने सोळा डब्यांची ट्रेन देण्यात आली. यासाठी ११ जनरल डबे, दोन एसी, दोन स्लीपर कोच आणि गार्ड कम जनरल डबा जोडण्यात आला. या ट्रेनची माहीती कार्यकर्त्यांना मिळावी यासाठी मुंबई भाजप प्रदेश कार्यालयाव्दारे प्रत्येक पदाधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांच्याव्दारे कार्यकर्त्यांना माहीती देण्यात आल्याचे भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात आले. ही ट्रेन कार्यकर्त्यासाठी एक तास अगोदरच सीएसटी स्थानकात लावण्यात आली होती. ही ट्रेन बुधवारी सकाळी साडे आठ वाजता पोहोचल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी त्याचदिवशी रात्री नऊ वाजता निघणार होती.