शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांमुळेच काँग्रेस कमकुवत !

By admin | Updated: September 14, 2015 02:01 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेसाठी काँग्रेसचा वापर करुन घेतल्यानेच आज पक्ष कमकुवत झाला आहे. अलीकडच्या काळात तर काँग्रेस पक्ष त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेसाठी काँग्रेसचा वापर करुन घेतल्यानेच आज पक्ष कमकुवत झाला आहे. अलीकडच्या काळात तर काँग्रेस पक्ष त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी केले. मराठवाड्याने यापुढील निवडणुका केवळ पाण्याच्या मुद्यावरच लढवाव्यात, असे आवाहन त्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले.बारामतीकरांची पाठिंब्याची चाल नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच ओळखली. त्यामुळे पवारांना प्रयत्न करूनही सत्तेबाहेर बसावे लागले, असा टोला विखे- पाटील यांनी लगावला. गेल्याच आठवड्यात विखे यांनी राज्यातील दुष्काळाला पवार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावर विखे- पाटील यांनी कोणाचा मुखवटा घातला आहे, असा सवाल राष्ट्रवादीने केला होता. विखे- पाटील यांनी मात्र त्याला उत्तर न देता रविवारी पुन्हा पवारांवर आरोपांची सरबत्ती केली. बारामतीकरांनी सत्ता पूर्णपणे त्यांच्या इच्छेनुसार राबवली. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची ससेहोलपट झाली. सत्ता अनुकूल असूनही पवारांनी तेव्हा पाणीप्रश्न प्रलंबित ठेवला. फडणवीस सरकार पाडण्यासाठी त्यांनी सेनेला तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने ते निराश झाले असावेत. सत्तेत भागीदारी मिळाली असती तर त्यांनी मोर्चा काढला असता का, असा प्रश्न विखे-पाटील यांनी केला. एवढी वर्षे पाटबंधारे खाते सांभाळूनही सिंचनाचा प्रश्न कासुटला नाही, हे काम अनावधानाने राहून गेले का, असा सवाल त्यांनी केला. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील आज असते तर त्यांनी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी जीवाचे रान केले असते. सरकारने केंद्राचा निधी व कर्जरोख्यातून हा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)