शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्, राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नामांतरावरून पुन्हा आघाडीत कुरबुरी, काँग्रेसने शिवसेनेला ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 06:58 IST

औरंगाबादच्या  नामांतरावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून कॉंग्रेसवर  केलेल्या टीकेला थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करीत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?

मुंबई :औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत कुरबुरी सुरूच असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी काँग्रेसच्या भूमिकेचा पुनरुच्चार करतानाच शिवसेना आणि भाजप जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. शिवसेनेला मतांची चिंता वाटत असल्यानेच त्यांनी नामांतराचा सामना सुरू केला आहे. तर, ढोंगीपणा हे भाजपचे वैशिष्ट्यच असल्याने त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणूनच पाहते, असा टोला थोरात यांनी लगावला.

औरंगाबादच्या  नामांतरावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून कॉंग्रेसवर  केलेल्या टीकेला थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करीत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही, असा सवाल थोरात यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपने औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे; म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर
त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे फार काळ चालणार नाही, औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्त्वाचा आहे, असे थोरात म्हणाले.

दरम्यान, औरंगजेब तुमचा कोण लागतो, असा सवाल शिवसेनेने केला होता. यावर, छत्रपतींचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत व छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही आमची आराध्य दैवते आहेत. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शांची मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू, असे थोरातांनी स्पष्ट केले.

पण, महाविकास आघाडी सरकार स्थिर -
- एकीकडे नामांतरावरून 
शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवितानाच महाविकास आघाडी सरकार मात्र स्थिर आणि खंबीर असल्याचा दावाही थोरातांनी केला. 
- नामांतराच्या मुद्द्यावर सरकार अस्थिर होईल या भ्रमात कोणी राहू नये. एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. 
- हा कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार 
आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना