पराभवाला काँग्रेसच जबाबदार - राष्ट्रवादी

By Admin | Updated: May 23, 2014 16:40 IST2014-05-23T16:39:52+5:302014-05-23T16:40:19+5:30

लोकसभा निवडणुकीमध्ये युपीएच्या घटकपक्षांच्या झालेल्या पराभवाला काँग्रेस जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केले आहे.

Congress is responsible for defeat - NCP | पराभवाला काँग्रेसच जबाबदार - राष्ट्रवादी

पराभवाला काँग्रेसच जबाबदार - राष्ट्रवादी

>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २३ - लोकसभा निवडणुकीमध्ये युपीएच्या घटकपक्षांच्या झालेल्या पराभवाला काँग्रेस जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केले आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला अंधारात ठेवले असे सांगतानाच ज्या ज्या पक्षांनी केंद्रातल्या युपीएमध्ये राहणं नाकारलं त्या त्या पक्षांना लोकांनी झिडकारलं असल्याचं पटेल म्हणाले. शरद पवारांचा सल्ला काँग्रेसने ऐकला नाही तसेच अनेक बाबतीत त्यांनी राष्ट्रवादीला अंधारात ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार यांनीही विधानसभेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवताना सगळ्या नेत्यांनी साधेपणाने रहावे असा सल्ला दिला आहे. तसेच नेत्यांनी लोकांमध्ये जावं, त्यांच्यात मिसळावं असा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: Congress is responsible for defeat - NCP