शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 12:02 IST

काँग्रेसकडून २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसच्या २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पाठोपाठ काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये २३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये भुसावळ, वर्धा, अकोट या मतदारसंघांचा सुद्धा समावेश आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरु असून हळूहळू बैठकानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. त्यानुसार काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता प्रचाराला वेग येणार असून उमेदवारांना पुढची दिशा ठरवता येणार आहे.

सुरुवातीला ४८ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने पुन्हा २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या यादीमध्ये विदर्भातील जागांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघातून सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भंडारा येथून पूजा ठवकर तर अर्जुनी मोरगाव येथून दिलीप बनसोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमगावमध्ये विद्यमान आमदारां ऐवजी राजकुमार पुरम यांना उमेदवारी मिळाली आहे. तर राळेगावमध्ये माजी मंत्री वसंत पुरके यांना संधी मिळाली आहे. दुसरीकडे नागपूर दक्षिण या मतदारसंघाबाबतही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. ती जागा  अखेर काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. काँग्रेसने या जागेवरुन गिरिश पांडव यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडीकडून १९६ उमेदवार जाहीर

महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये ९०-९०-९० असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ८० तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेसकडून ७१ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार महाविकास आघाडीने १९६ उमेदवार जाहीर केले आहेत.

२३ उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ

भुसावळ - राजेश मानवतकरजळगाव - स्वाती वाकेकरअकोट - महेश गणगणेवर्धा - शेखऱ शेंडेसावनेर - अनुजा केदारनागपूर दक्षिण - गिरिश पांडवकामठी - सुरेश भोयरभंडारा - पूजा ठवकरअर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोडआमगाव - राजकुमार पुरमराळेगाव - वसंत पुरकेयवतमाळ - अनिल मांगुलकरआर्णी - जितेंद्र मोघेउमरखेड - साहेबराव कांबळेजालना - कैलास गोरंट्यालऔरंगाबाद पूर्व - मधुकर देशमुखवसई - विजय पाटीलकांदिवली पूर्व - काळू बधेलियाचारकोप - यशवंत सिंगसायन कोळीवाडा - गणेश यादवश्रीरामपूर - हेमंत ओगलेनिलंगा - अभय कुमार साळुंखेशिरोळ - गणपतराव पाटील  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNana Patekarनाना पाटेकर