शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीत बहिष्कारावरून फूट

By admin | Updated: December 15, 2014 03:44 IST

आमदारांच्या निलंबनावरून शुक्रवारी विधानसभेत एकत्र येत सभात्याग करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील कामकाजावरील बहिष्कारावरून फूट पडली आहे.

कमलेश वानखेडे, नागपूरआमदारांच्या निलंबनावरून शुक्रवारी विधानसभेत एकत्र येत सभात्याग करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील कामकाजावरील बहिष्कारावरून फूट पडली आहे. सोमवारी विधानसभेच्या कामकाजात भाग न घेता पायऱ्यांवर बसून सरकारचा ‘बीपी’ वाढविण्याचा बेत राष्ट्रवादीने आखला असताना काँग्रेसने मात्र सभागृहात बसून गारपीट व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष अधिवेशनात राज्यपालांची अवमानना केल्याच्या मुद्यावरून काँग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले होते. तर हिवाळी अधिवेशनात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. या वेळी निलंबनाचे घाव सोसणाऱ्या काँग्रेसनेही राष्ट्रवादीला साथ दिली व सभात्याग केला. सोमवारी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून सरकारवर दबाव निर्माण करायचा व आपल्या आमदारांचे निलंबन रद्द करून घ्यायचे, अशी रणनीती विरोधकांनी आखली होती. मात्र, काँग्रेसने वेगळी भूमिका घेतल्यामुळे आता या मुद्यावर राष्ट्रवादी एकटी पडली आहे. काँग्रेसचे पाच सदस्य निलंबित करण्यात आले तेव्हा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला पाठबळ मिळाले नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा एक सदस्य निलंबित झाले म्हणून राष्ट्रवादी घेईल तीच भूमिका काँग्रेसने कशासाठी घ्यावी, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. तर, सरकारचा कारभार एकतर्फी सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.