शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

“बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाही, मुख्यमंत्री अजून राजीनामा घेत नाहीत”: प्रणिती शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:04 IST

Congress MP Praniti Shinde News: बीड प्रकरण विरोधकांनी लावून धरले असून, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने आणखी जोर धरला आहे.

Congress MP Praniti Shinde News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड याला तपास यंत्रणांकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केले. याचवेळी तिथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पोहोचले. त्यांनी समजूत काढल्यावर धनंजय देशमुख खाली उतरले. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा दिला आहे. यातच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी यासंदर्भात टीका केली आहे. 

विरोधकांनी हे प्रकरणच चांगलेच लावून धरले आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने केली आहे. विरोधक या मागणीवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत. सगळी लोकं त्यांच्याविरोधात बोलत आहेत. तरीही काहीही होत नाही. त्या सगळ्या प्रकरणाचे मास्टरमाइंड ते असूनही जर त्यांचे नाव येत नसेल तर त्यांना कुठेतर संरक्षण त्या मंत्रि‍पदाच आहे. ते फिल्मी स्टाइलने येतात आणि सरेंडर होतात. याचा अर्थ कुठेतरी संरक्षण आहे, हा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा देऊन पदापासून दूर व्हावे, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी सरकारवर टीका केली. 

बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाही, मुख्यमंत्री अजून राजीनामा घेत नाहीत

सरकार या बाबतीत अजिबात गंभीर नाही. बीड,परभणीमध्ये दररोज नवे पैलू दिसून येत असून नवीन माहिती समोर येत आहे. तरीही मुख्यमंत्री याबाबतीत गंभीर नाही. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. मात्र, मुख्यमंत्री तो ही घेत नाहीत. त्यामुळे एकंदरीत हे सरकार निगरगट्ट झाले आहे, असे दिसून येत आहे. सुरेश धस अस म्हणाले की, जनावराला असे मारले तर अंगावर शहारे येतात, हे तर माणसाला मारत आहेत आणि हे अस बीड जिल्ह्यात पहिल्यांदा झाले नाही. बीड जिल्हा हा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेले मात्र आता त्यांना हे भोगावे लागणार असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली. 

दरम्यान, नैतिकता ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. आत्तापर्यंत ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकतेमुळेच दिले. आपण थोडावेळ बाजूला झाले पाहिजे. सुरेश धस म्हणाले की, चौकशी सुरु आहे तोपर्यंत मंत्रिपदासून बाजूला व्हा. क्लिन चीट मिळाली तर या परत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे. बजरंग सोनावणे यांची मागणी आहे. नैतिकता म्हणून लोकप्रितिनिधींनी राजीनामा दिला पाहिजे, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणcongressकाँग्रेस