शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाणांकडे नवी जबाबदारी; काँग्रेसच्या महत्त्वाच्या समितीत मानाचं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 22:04 IST

काँग्रेस नेतृत्त्वाकडून पृथ्वीराज चव्हाणांना महत्त्वाची जबाबदारी

मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडेकाँग्रेसनं महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. मध्य प्रदेश जाहीरनामा अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी चव्हाण यांची निवड केली आहे. राज्यात मंत्रिपद देण्यात न आल्यानं चव्हाण यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात येणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. निवडणुकीआधी राजकीय पक्षांचे जाहीरनामे चर्चेत असतात. मात्र निवडणूक संपल्यानंतर अनेक पक्षांना त्यांचा विसर पडतो. ही बाब टाळण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी जाहीरनामा पाच राज्यांसाठी अंमलबजावणी समिती स्थापन केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगड, पुदुच्चेरीसाठी काँग्रेसनं प्रत्येकी एक समिती तयार केली आहे. यापैकी मध्य प्रदेशच्या समितीचं कामकाज पृथ्वीराज चव्हाण पाहतील. महाविकास आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना महत्त्वाचं मंत्रिपद मिळेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होती. विधानसभा अध्यक्षपदी तरी त्यांना संधी दिली जाईल, अशीदेखील शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र राज्यातल्या नव्या सरकारमध्ये चव्हाण यांना कोणतंही स्थान न मिळाल्यानं त्यांच्याकडे कोणती जबाबदार दिली जाणार, याबद्दल उत्सुकता होती. अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदांवर काँग्रेस नेतृत्त्वानं वरिष्ठ नेत्यांची निवड केली आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे पंजाबची, माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्याकडे छत्तीसगड, वीरप्पा मोईलींकडे पुद्दुचेरीची, तर लोकसभेतले खासदार ताम्राध्वज साहू यांच्याकडे राजस्थानच्या समितींच्या अध्यक्षपद देण्यात आलं आहे. काँग्रेस शासित राज्यांसाठी सोनिया गांधींनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या राज्यांमध्ये पक्ष आणि सरकारमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी नव्या समितींची स्थापना करण्यात आली आहे. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस