शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित इंग्रजी शाळांच्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:39 IST

राज्यात ४,५४० तर मुंबई, ठाण्यात १०० हून अधिक शाळा बंद

मुंबई : राज्य शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ फेडरेशन आॅफ स्कूल असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने सोमवारी राज्यातील विनाअनुदानित इंग्रजी शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रायव्हेट अनएडेड स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी दिली. राज्यभरात तब्बल ४,५४० शाळांनी तर कल्याण, डोंबविली आणि मुंबईमधून १०० हून अधिक शाळांनी या बंदला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. ज्या शाळांमध्ये बारावीचे परीक्षा केंद्र आले होते त्या शाळा बंदमधून वगळल्या होत्या. काही शाळांमधील प्रात्यक्षिक परीक्षांमुळे त्या दुपारनंतर अर्ध्या दिवसाने बंद ठेवण्यात आल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. बंद हा केवळ सरकारला इशारा होता. यापुढे पुन्हा एकत्रित येऊन यासंदर्भातील पुढची दिशा ठरविली जाईल, असे त्यांनी सांगितले.

२५ टक्के विद्यार्थ्यांच्या शुल्काचा भार अतिरिक्त ७५ टक्के विद्यार्थ्यांवर येत असल्याने पालकही नाराज आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर २५ टक्के प्रवेशातील शाळांसाठीच्या जाचक अटी, नियम रद्द करून त्यात सुधारणा करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.या आहेत प्रमुख मागण्या?१ नोव्हेंबर २०१८चा शासन निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा व २०१२ ते २०१९ पर्यंतच्या आरटीईच्या २५ टक्के प्रवेशांचा थकीत फी परतावा शाळांना तातडीने मिळावा.च्राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कवच कायदा करावा.च्१८ नोव्हेंबर २०१३ च्या शासन आदेशात दुरुस्ती करावी व शालेय विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात मुख्याध्यापकांऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकांवर जबाबदारी सोपवावी.च्स्वयं अर्थसाहाय्य तत्त्वावर दर्जावाढ करण्याच्या प्रस्तावांसाठी आॅनलाइन प्रक्रिया तातडीने सुरू करावी.