शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

‘एआयबी नॉकआऊट’ विरोधात तक्रारी

By admin | Updated: February 3, 2015 11:51 IST

अश्लिल जोक्स, शेरेबाजी आणि व्यक्तीकेंद्रीत टीपण्णीचा भडीमार असलेल्या एआयबी नॉकआऊटस या शोविरोधात शहरातल्या विविध पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी आल्या आहेत.

अश्लिल विनोद : कलाकारांचे बीभत्स हावभावमुंबई : अश्लिल जोक्स, शेरेबाजी आणि व्यक्तीकेंद्रीत टीपण्णीचा भडीमार असलेल्या एआयबी नॉकआऊटस या शोविरोधात शहरातल्या विविध पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींमध्ये चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, या शोचे सूत्रसंचालक अभिनेते अर्जून कपूर, रणवीर सिंग आणि शोच्या आयोजकांविरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.२० डिसेंबरला वरळीत हा शो झाला. यात जोहरसह अर्जून, रणवीर यांनी सुमारे चारेक हजार श्रोत्यांसमोर अत्यंत अश्लिल, भाषेत, बीभत्स हावभाव व हातवारे करून जोक्स सांगितले, उपहासात्मक टीपण्णी केली. श्रोत्यांमध्ये बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री अलीया भटट, दिपीका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. विशेष म्हणजे तरूणाई आणि महिलांची उपस्थिती श्रोत्यांमध्ये अधिक होती. जोहर, रणवीर, अर्जून यांच्या अश्लिलतेवर सारेच टाळया, शिटटया वाजवून दाद देताना दिसले.या शोमधील तीन चित्रफिती यूटयूबवरून सर्वत्र प्रसारीत झाल्या. गेल्या दोनेक दिवसांमध्ये सोशलमिडीच्या माध्यमातून बहुतांश सर्वसामान्यांनी त्या ऐकल्या.याविरोधात ब्राम्हण सेवा संस्थानचे अध्यक्ष अखिलेश तिवारी यांनी साकिनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार जोहर, अर्जून, रणवीर यांच्यासह शोच्या आयोजकांविरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई केली जावी जेणेकरून अशाप्रकारचे बीभत्स कार्यक्रम जाहीररित्या करू पाहाणाऱ्यांना चाप बसेल. या शोमधून भारतीय संस्कृतिची, महिलांची विटंबना करण्यात आली आहे. तरूणांच्या मनावर या शोमुळे वाईट परिणाम होऊ शकतो, असेही तिवारी तक्रारीत नमूद करतात.तिवारी यांच्याकडून लेखी तक्रार मिळाली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती साकिनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक प्रसन्ना मोरे यांनी लोकमतला सांगितले.पोलीस दलाचे प्रवक्ते आणि धनंजय कुलकर्णी यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार हा शो ताडदेव पोलीस ठाण्याच्या हददीत पार पडला. त्यांनतर साकिनाकासह वांद्रे व माहिम पोलीस ठाण्यात लेखीतक्रारी आल्या आहेत. मात्र अद्याप गुन्हा नोंद नाही. याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे त्यानी स्पष्ट के ले. (प्रतिनिधी)विनोद तावडेंनी दिले चौकशीचे आदेश‘एआयबी नॉक आऊट’ या पहिल्यावहिल्या भारतीय डार्क कॉमेडीवरून वाद निर्माण झाला आहे. दिग्दर्शक करण जोहरसह, रणवीर सिंग, अर्जुन कपूर यांनी सादर केलेला कार्यक्रम एकीकडे युट्युबवर हिट ठरत असतानाच कार्यक्रमातील असभ्य भाषा आणि विनोदावरून तीव्र टीकाही होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची चौकशी करण्याचे आदेश सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.