शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यातून भरपाई जाहीर; १,२१९ कोटी रुपये मिळण्यास सुरुवात

By नितीन चौधरी | Updated: April 16, 2026 10:28 IST

Crop Insurance: गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या  नुकसानीपोटी पंतप्रधान पीकविमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिकेवगळता अन्य पिकांसाठी १ हजार २१९ कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे.

- नितीन चौधरीपुणे - गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या  नुकसानीपोटी पंतप्रधान पीकविमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिकेवगळता अन्य पिकांसाठी १ हजार २१९ कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे. सर्वाधिक ८१३ कोटी रुपयांची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांची नुकसानभरपाई मिळेल. 

गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे खरिपात तब्बल ९८ लाख ४३ हजार ८२३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेतून हेक्टरी १७ हजार रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पीकविमा योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगांवर आधारित आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे १२ हजार महसूल मंडळांमधील (तलाठी सजा) पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर टाकण्यात आली. उत्पादन कमी आले असले तरी नुकसानभरपाई मिळणार आहे. 

७,५०० महसूल मंडळांची माहिती झाली पूर्णया १२ हजार महसूल मंडळांपैकी सुमारे साडेसात हजार मंडळांची नुकसानभरपाईची माहिती अंतिम झाली. त्यालाविमा कंपन्यांनी सहमती दर्शविल्यानंतर नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कापूस आणि तूर या पिकांच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारीअखेर असल्याने या उर्वरित पाच हजार मंडळांची माहिती येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे   नुकसानभरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचा समावेश असून सुमारे ३५ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरविण्यात आला होता.

नुकसान भरपाईची मदत जिल्हानिहाय (आकडे लाखांत)नांदेड    ८१,३३७.९७अहिल्यानगर    ११,८३५.०४हिंगोली    ९,८९५.५६परभणी    ६,३७८.०२गोंदिया    ३,१०१.७७ठाणे    १,७९३.८२पालघर    १,५३४.७७वर्धा    ९६१.८२नाशिक    ८७८.७८सोलापूर    ६८४.०६बुलढाणा    ५६४.९८भंडारा    ४३३.६८सातारा    ३६२.१८चंद्रपूर    २६०.५०अमरावती    २५०.२०गडचिरोली    २२४.३६नंदुरबार    २०९.४१जालना    २०९.३३नागपूर    १९४.७०अकोला    १५८.९४सांगली    १२७.१४वाशिम    १०९.००जळगाव    १०६.९५रायगड    १०६.३४धुळे    १०३.१५पुणे    १००.०६संभाजीनगर    २५.०१सिंधुदुर्ग    २३.२९रत्नागिरी    ७.०८कोल्हापूर    ०.२७एकूण     १,२१,९७८.१८

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Insurance Compensation Announced: ₹1,219 Crore Disbursement Begins for Farmers

Web Summary : Farmers in 30 districts receive ₹1,219 crore crop insurance for Kharif season losses, excluding cotton and tur. Nanded gets the largest share. Compensation based on crop cutting experiments. Second phase includes cotton and tur losses.
टॅग्स :Crop Insuranceपीक विमाMaharashtraमहाराष्ट्र