शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री साधणार प्रशिक्षणार्थींशी संवाद

By admin | Updated: September 22, 2016 05:23 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान वेब बेस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.


मुंबई : राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींसोबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान वेब बेस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या उपक्रमात राज्यातील ५६ शासकीय आयटीआयची निवड करण्यात आली असून खासगी आयटीआयला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या खासगी आयटीआय प्राचार्य, कर्मचारी संघटनेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ४१७ शासकीय आणि ४५४ खासगी आयटीआय आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रवेश प्रक्रियेत ८६ हजार २६४ प्रशिक्षणार्थींनी शासकीय आणि ३० हजार ७८४ प्रशिक्षणार्थींनी खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेतले. प्रशिक्षणार्थींना विविध ७८ प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘स्कील इंडिया’ या योजनेबाबत संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळायला हवी. मात्र प्रशासनाने दुजाभाव करत खासगी आयटीआयबाबत पुन्हा दुजाभाव केल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी केला आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिग सुविधा असल्यानेच पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय आयटीआयची निवड केल्याचा खुलासा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केला आहे. भविष्यात खासगी आयटीआयचीही निवड केली जाईल, असेही संचालनालयाने स्पष्ट केले. तूर्तास तरी शासनाच्या विभागस्तरावर हा निर्णय झाला असल्याने कोणीही रागवण्याचे कारण नाही, असे आवाहन संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केले आहे.