शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

मुखपत्रातून सेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका

By admin | Updated: January 31, 2015 05:24 IST

सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना वारंवार सरकारविरोधी भूमिका घेत असून भाजपासोबत समन्वय साधण्याचा प्रस्ताव धाब्यावर बसवत

मुंबई : सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना वारंवार सरकारविरोधी भूमिका घेत असून भाजपासोबत समन्वय साधण्याचा प्रस्ताव धाब्यावर बसवत पुन्हा एकदा मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य करण्यात आले आहे.शिवसेनेने विदर्भात शिवसंपर्क मोहीम राबवण्याची केलेली घोषणा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी झालेल्या कार्यक्रमात भाजपावर केलेली टीका या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई व खासदार अनिल देसाई यांच्याशी समन्वय समिती स्थापन करण्याबाबत चर्चा केली. त्याचवेळी शिवसेनेने टीकेची तोफ डागली आहे. दावोस येथे महाराष्ट्राचा डंका पिटला जात असताना शेतकरी आत्महत्या करून मरत आहे हे चित्र विदारक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. ज्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांकडे मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे मोबाईल फोनची बिले भरता, मग कर्जाचे हप्ते भरायला काय जाते? असे विचारण्याची सोय नाही, असा टोला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा नामोल्लेख न करता लगावला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्यावर सर्व प्रश्न सुटतील, अशी हाळी कुणी देत असेल तर ते दिशाभूल करीत असल्याचेही सेनेने म्हटले आहे. दरम्यान, वृत्तपत्रामध्ये आलेल्या लेखांवर प्रतिक्रिया देण्याची आमची पद्धत नाही, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अग्रलेखावर अधिक बोलण्याचे टाळले.