शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना आचारसंहिता

By admin | Updated: September 10, 2014 00:45 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाला शिस्त लावतानाच कामाच्या वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी सोमवार १५ सप्टेबरपासून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक

जिल्हाधिकारी कार्यालय: बायोमेट्रिक नोंद सक्तीचीनागपूर: जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाला शिस्त लावतानाच कामाच्या वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी सोमवार १५ सप्टेबरपासून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या शिवाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे नाव व पदनामाची पाटीही लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.जे कर्मचारी किंवा अधिकारी बायोमेट्रिकमध्ये नोंद करणार नाही त्यांना गैरहजर समजून त्या दिवसाचे वेतन व भत्ते दिले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे.मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत त्यांच्या विभागात अनुपस्थित राहात असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तेथील विविध विभागांची माहिती नसते. त्यामुळे त्यांना संपूर्ण कार्यालयात भटकंती केल्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा त्यांना चुकीची माहिती दिली जाते. नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी विभाग प्रमुखांनी त्यांच्या नावाचा व पदनामाचा नाम फलक दर्शनी भागात लावावा. त्याच प्रमाणे प्रत्येक शाखेत रोज होणाऱ्या कामाची माहिती जनतेला माहिती व्हावी यासाठी नागरिकांची सनद लावण्यात यावी व त्याची एक प्रत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना द्यावी, त्याच प्रमाणे ती संकेतस्थळावरही टाकण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणाऱ्या फाईल्सवर संकलन क्रमांक नोंद करणे, त्याच प्रमाणे फाईलची बांधणी योग्य पद्धतीने करणे, निपटारा झालेल्या फाईल्सच्या नोंदी करून त्या ३० नोव्हेबरपर्यत अभिलेखा कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. संगणकाचा वापर करताना वेगवेगळे फॉन्ट्स वापरले जातात. त्यात साम्यता येण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी युनिकोड वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)