शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:54 IST

CM Devendra Fadnavis: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

CM Devendra Fadnavis:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे दोन्ही गट त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. एकीकडे काका-पुतण्या एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच जयंत पाटील यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सर्व जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती शरद पवार यांना केली. याबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे. 

प्रदेशाध्यक्षपदाच्या सगळ्या जबाबदारीतून मला मुक्त करा. मला शरद पवार यांनी अनेकदा संधी दिली. आहेत. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुमच्या सर्वांसमोर शरद पवार यांना एवढीच विनंती करेन की, शेवटी हा पक्ष शरद पवारांचा आहे. त्यामुळे शरद पवार याबाबत निर्णय घेतील. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे. आजवर मिळालेल्या संधीसाठी शरद पवारांचे आभार मानतो आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही आभार मानतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

त्यांच्या मनात शिरुन ते जाणून घेऊन...

जयंत पाटील यांच्या मनात मला शिरावे लागेल. सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त करा म्हणाले, ते जबाबदारीतून मुक्त करणार हे माहिती असल्यामुळे म्हणाले की, त्यांच्या मनात दुसरे काही आहे, हे समजून घ्यावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यासंबंधी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर, ते एकत्रित येणार की नाही? हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या मनात शिरुन ते जाणून घेऊन तुमच्यापुढे ठेवण्याची माझ्याकडे शक्ती नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, मुंब्रा लोकल अपघातात १३ जण जखमी झाले आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आगामी काळात अशी घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात येऊ शकतो. मात्र खाजगी कार्यालयांमध्ये ते करणे थोडे कठीण आहे. कारण यामुळे कंपन्यांच्या नफा-तोट्यावर परिणाम होतो. मात्र आगामी काळात याबाबत निर्णय होऊ शकतो.

 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा