शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाईवर वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा...
4
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
5
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
6
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
7
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
8
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
9
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
10
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
11
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
12
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
13
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
14
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
15
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
16
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
17
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
18
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
19
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
20
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis : "अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणार"; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:22 IST

Devendra Fadnavis And hilyabai Holkar : देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 

"एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार असताना अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय आपण  घेतला. राम शिंदे आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. यासाठी मी जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटलो आणि सांगितलं की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी निमंत्रित करायचं आहे. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्यासमोर हा प्रश्न आहे की एकीकडे जन्मस्थळ आणि दुसरीकडे कर्मस्थळ." 

"छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला देदीप्यमान इतिहास माहिती झाला"

"मोदींनी सांगितलं की, यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मस्थळावर मी सभा घेण्याचं ठरवलं आहे. मात्र पुढच्यावेळी जन्मस्थळावर नक्की येईल असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्याला दिला. कधी-कधी इतिहास फार क्रूर असतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता दुर्देवाने चित्रपटाची निर्मिती झाली आणि छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला देदीप्यमान इतिहास माहिती झाला. याआधीही माहिती होता पण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण कुठेतरी अपयशी झालो होतो."

"अहिल्यामातांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार"

"आमच्या लक्षात आलं की चित्रपट हे असं माध्यम आहे त्यामधून इतिहास सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आपल्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे की, अहिल्यामातांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट आपण तयार करणार आहोत. सर्व भाषांमध्ये तयार करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अहिल्यामातांचं चरित्र, त्यांचं कर्तृत्व आणि देशावरचे उपचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे.  अहिल्यामातांकडून प्रेरणा घेऊन आपण काम करत आहोत" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAhilyanagarअहिल्यानगर