शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात रिपरिप; उपनगरात जोरदार, झाडांची पडझड सुरूच!

By admin | Updated: June 22, 2015 05:11 IST

मुंबई शहर आणि उपनगरात कोसळणाऱ्या पावसाने रविवारी आपला वेग कायम ठेवला आणि तिसऱ्या दिवशीही मुंबई ओलिचिंब झाली.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोसळणाऱ्या पावसाने रविवारी आपला वेग कायम ठेवला आणि तिसऱ्या दिवशीही मुंबई ओलिचिंब झाली. रविवारी दिवसभर पडलेल्या जलधारांमुळे कुलाबा आणि सांताक्रुझ या वेधशाळांत अनुक्रमे ६६.८, १३०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पुढील २४ तासांमध्ये मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.दिवसभरात शहरात ४, पूर्व उपनगरात ५ आणि पश्चिम उपनगरात ६ अशा एकूण १५ ठिकाणी घरांचा/भिंतींचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. शनिवारी विलेपार्ले येथे ओल्ड कपोल बँकेच्या बाजूला स्लॅब पडून जागृती गांधी ही महिला जखमी झाली. तर शनिवारी मध्यरात्री वांद्रे पूर्वेकडील नेजवान चाळ येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना चौथ्या मजल्याचा काही भाग पडला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर ४ जखमी झाले. यास्मिन शेख (२७) आणि सरिना शेख (१३) अशी मृतांची नावे आहेत, तर जखमींमध्ये बिल्कीश अली, जिब्रान शेख, हरिदा शेख, इश्रायत कुरेशी यांचा समावेश आहे. सांताक्रुझ पूर्वेकडे शनिवारी झाड पडून अजय मुंठन (३५) या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, खार पश्चिमेकडील नाल्यात पडलेल्या कंत्राटी कामगारांचा अद्याप शोध लागलेला नाही. भांडुप पश्चिमेकडील हनुमान टेकडी येथे दरडीचा भाग कोसळण्याची घटना घडली असून, शहरात १२, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण १६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. शहरात ३०, पूर्व उपनगरात २० आणि पश्चिम उपनगरात ३५ अशा एकूण ८५ ठिकाणी झाडे पडली.मुंबई शहरात हिंदमाता, सायन रोड क्रमांक २, किंग्ज सर्कल, दादर टीटी, पूर्व उपनगरात साकीनाका येथील ९० फीट रोड, कुर्ला स्टेशन रोड, पश्चिम उपनगरात वांद्रे येथील कार्टर रोड, जुहूमधील मोरागाव, सांताक्रुझमधील शिवाजी नगर, गोरेगाव येथील डोंगरी, मालाड-मालवणी, खार पश्चिमेकडील १८वा रस्ता इ. ३५ ठिकाणी पाणी साचले. उदंचन संच आणि मनुष्यबळाचा वापर करून येथील पाण्याचा निचरा करण्यात आला. (प्रतिनिधी)