शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुलानेच जन्मदात्याला टाकले वाळीत

By admin | Updated: January 30, 2015 04:16 IST

श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल या गावातील कुणबी जातपंचायतीने नथुराम (८५) व लक्ष्मी घडशी (७५) या दाम्पत्याला गेल्या सहा वर्षांपासून वाळीत

जयंत धुळप, अलिबागश्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल या गावातील कुणबी जातपंचायतीने नथुराम (८५) व लक्ष्मी घडशी (७५) या दाम्पत्याला गेल्या सहा वर्षांपासून वाळीत टाकल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. यात या दाम्पत्याचा मुलगाच सहभागी आहे. या प्रकरणी घडशीने भरडखोल कुणबी जातपंचायतीविरोधात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर व रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याकडे तक्रार केली आहे. नथुराम घडशी यांच्या मालकीची भरडखोल येथे जमीन आहे. त्यात पूर्ण हिस्सा पाहिजे, अशी मागणी त्यांचाच मुलगा राजेश घडशी याने केली. त्या वेळी, तुझ्या लग्नाकरिता घेतलेले कर्ज आधी फेडले तरच मी तुला जमिनीमध्ये हिस्सा देईन, असे वडिलांनी सांगितले. त्यामुळे रागावून राजेश जातपंचायतीकडे गेला. त्याचे सासरे दामू नागले व त्यांचा भाऊ शंकर नागले हे गावकीचे अध्यक्ष होते. राजेशला हिस्सा देण्याचा आदेश जातपंचायतीने २००७ साली दिला. परंतु नथुराम निर्णयावर ठाम राहिले. परिणामी, घडशी दाम्पत्याला सहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आले आहे. या प्रकरणी या वृद्ध दाम्पत्याने भरडखोल कुणबी जात गावकीचे अध्यक्ष शंकर नागले, गोविंद घडशी, कृष्णा शिगवण, महिला गावकी अध्यक्षा विजया खळे, महादेव हुमणे, सुरेश  वागजे, सीताराम वागजे, रामचंद्र ठोंबरे, दामू नागले, कमल नागले, रुपा हुमणे, निर्मल घडशी, सदानंद काजारे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी या प्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. घडशी यांचा मोठा मुलगा हरिश्चंद्र यालाही त्याची पत्नी अर्चना देवदेवस्की करत असल्याचा आरोप करत वाळीत टाकण्यात आले होते. त्याच्याकडे २० हजार रुपयांची भरपाई मागितली होती. मात्र त्यांनी ती अमान्य केली. परंतु अवहेलना सहन न झाल्याने त्याने चार वर्षांनी दंड भरला आणि बंदीतून सुटका करून घेतली. त्यानंतर तो कुटुंबियासह गाव सोडून पनवेलला गेला. मुख्यमंत्री व मानवी हक्क आयोगाकडे तक्रार पार्वती धाडवे या वयोवृध्द महिलेला देखीलगावपंचांनी १५ वर्षे वाळीत टाकले असल्याचेही या निमीत्ताने समोर आले आहे. याबाबत नथुराम घडशी यांनी आपल्या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, श्रीवर्धन उपविभागीय महसूल अधिकारी, श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन तहसीलदार व मानवी हक्क आयोग यांना पाठविल्या आहेत.